जब्बार चीनी, वणी: आज पुन्हा कोरोनाने तालुक्यात फिफ्टी पार केली. आज दिनांक 6 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 50 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 22 तर ग्रामीण भागातील 28 रुग्णांचा समावेश आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 160 झाली आहे. याशिवाय खासगी लॅबमध्ये कोरोनाचे 20 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 70 झाले आहेत.
आज आलेल्या रुग्णामध्ये शहरातील इंदिरा चौक व शास्त्री नगर येथे प्रत्येकी 3 रुग्ण, गुरुनगर, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, खाती चौक, सिंधी कॉलनी, लक्ष्मी नगर येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर कनकवाडी, देशमुखवाडी, गोकुल नगर, रंगारीपुरा, भोई पुरा, तलाव रोड, गुलमोहर चौक, रामपुरा, एकता नगर, जैन ले आऊट, भीम नगर, रविनगर येथे प्रत्येकी 1 पॉजिटिव्ह आढळून आला आहे. ग्रामीण भागात पुनवट येथे कोरोनाचे विस्फोट झाला असून या एकाच गावात आज 14 रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय चिखलगाव येथे 3 पॉजिटिव्ह, कुरई येथे 2 तर कुंद्रा, केसुर्ली व मुर्धोनी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.
आज यवतमाळ येथून 480 अहवाल प्राप्त झाले. यात 36 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात तर 444 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. याशिवाय आज 55 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 14 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 41 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 356 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 623 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 11 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली
सध्या तालुक्यात 163 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 65 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 69 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 26 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1654 रुग्ण आढळून आलेत. यातील 1468 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
खासगी कोविड केअर सेंटरही फुल
कोरोनाचे दिवसेंदिवस वाढणारे रुग्ण तालुक्याची चिंता वाढवत आहे. शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णसंख्या वाढत असताना आता खासगी कोविड केअर सेंटरही फुल झाले असून यात सध्या वेटिंग सुरू आहे. सध्या 8-10 बेडची वेटिंग आहे. याशिवाय 26 गंभीर रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. अद्याप 600 पेक्षा अधिक व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी आहे. सध्या कोरोना टेस्टच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ ही एक दिलासा देणारी बाब आहे.
वणी बहुगुणी हे देखील वाचा: