कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ, आज 7 पॉजिटिव्ह

भीमनगर, राजूर कॉ, येथे कोरोनाचा शिरकाव

0

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज मंगळवारी दिनांक 9 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 4 रुग्ण तर ग्रामीण भागातील 3 रुग्ण आहेत. वणी शहरातील रविनगर, भगतसिंग चौक, भीमनगर व जैन स्थानकाजवळ प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले तर ग्रामीण भागात राजूर कॉलरी, सोनापूर व मारेगाव येथील प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आलेत. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 29 आहेत.

रविवारी 131 संशयीतांचे यवतमाळ येथून रिपोर्ट प्राप्त झालेत. यात 7 व्यक्ती आलेत तर 124 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 37 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यातील सर्व व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 70 व्यक्तींचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आज 7 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली.

सध्या तालुक्यात 29 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 1 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 20 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 8 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1275 रुग्ण आढळून आलेत. यातील 1221 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

आज जिल्ह्यात दोघांचा मृत्यू
आज जिल्ह्यात कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर 318 रुग्ण आज आढळून आले आहेत. 258 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मृत झालेल्या व्यक्तींमध्ये यवतमाळ शहरातील 75 वर्षीय महिला आणि यवतमाळ तालुक्यातील 59 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

हे देखील वाचा:

कोरोना लस घेणा-या वृद्धांसाठी विश्राम कक्षाची स्थापना

नागपूरमध्ये करा लक्झरी फ्लॅट खरेदी

Leave A Reply

Your email address will not be published.