कोरोना लस घेणा-या वृद्धांसाठी विश्राम कक्षाची स्थापना

मनसेतर्फे ग्रामीण रुग्णालयासमोर उभारण्यात आले विश्राम कक्ष

0

जब्बार चीनी, वणी: ग्रामीण रुग्णालयात लस घ्यायला येणाऱ्या वृद्धांची गैरसोय होऊ नये म्हणून ‘राज’ विश्राम कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयासमोरच हा विश्राम कक्ष उभारण्यात आला आहे. लस घ्यायला येणार्‍या वृ्द्धांना रूग्णालयात खूप वेळ वाट पाहत थांबावे लागत आहे. त्यामुळे त्यांना विश्राम करण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

कोरोना लसीच्या दुस-या टप्याला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्यात अत्यावश्यक सेवेत काम करणा-या व्यक्तींना लस दिल्यानंतर आता सर्वसामान्य व्यक्तीसाठी दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यात वृद्ध व्यक्तींना लस दिली जात आहे. लस घेतल्यानंतर काही काळ विश्रांतीची गरज असते, परंतु लांब अंतरावरून आलेल्या नागरिकांना विश्राम करणे शक्य नाही. त्यामुळे या राज विश्राम कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून व्यापारी असोसिएशन अध्यक्ष राकेश खुराणा, राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, प्रेस वेल्फेअरचे अध्यक्ष गजानन कासावार यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, अनिल ढगे, रमेश सोनूले, आजित शेख, लक्की सोमकूवर, शुभम भोयर, शिवा पेचे, ईरफान सिद्धीकी, रोशन शिंदे, गौरव पूरानकर, अनिकेत येसेकर, नितीन ताजने, गूड्डू धोटे आदी मनसैनिक उपस्थीत होते.

हे देखील वाचा:

नागपूरमध्ये करा लक्झरी फ्लॅट खरेदी

 

Leave A Reply

Your email address will not be published.