सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड 19 च्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. बुधवारी दिनांक 17 मार्च रोजी तहसीलदार गिरीश जोशी व पंचायत समिती सभापती यांच्या हस्ते रिबीन कापून केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन होताच कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यात 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना व 45 वर्षावरील कोमारबीड लोकांना म्हणजे (गंभीर आजार असणा-या) नागरिकांना लसी देण्यास सुरुवात झाली. कोविडची लस घेण्याआधी जेवण करून येणे, सोबत ओळख म्हणून आधारकार्ड घेऊन येणे, लस घेतल्यावर अर्धा तास विश्रांती करणे व देखभाल कक्षात थांबणे ही काळजी घ्यायची आहे.
सदर लस सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार-बुधवार-शुक्रवार असे तीन दिवस लसीकरण सुरू राहणार आहे. तर सोमवार ते शनिवार झरी येथील ग्रामीण रुग्णालयात राहणार आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम यांनी दिली.
सर्व जेष्ठ नागरिक 60 वर्षांच्या वरील व कोमारबीड 45 वर्षांच्या वरील व फ्रंट लाईन वर्कर, सरकारी व खाजगी डॉक्टर व कर्मचारी यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी केले आहे. लसीकरण केलेल्या व्यक्तीला काही अडचण आल्यास तालुका प्रशासनास कळवावे असे तहसीलदार गिरीश जोशी यांनी सांगितले आहे
झरी तालुक्याला एकूण 56-वायल आले असून एक वायल मध्ये फक्त 10 जणांना लस दिल्या जाते. 56 वायल मध्ये 560 लोकांना देण्याइतकेच वायल उपलब्ध करण्यात आले आहे. झरी ग्रामीण रुग्णालयात 170 लोकांना तर मुकुटबन येथे 26 लोकांना असे एकूण 196 लोकांना लस देण्यात आली आहे. कोविड 19 ची लस कमी पडू नये याकरिता तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी वरिष्ठांकडे मागणी सुद्धा केली आहे. व लवकरच वायल उपलब्ध होणार असल्याची सुद्धा माहिती गेडाम यांनी दिली.
कोविड १९ लसीकरण उदघाटन करतेवेळी तहसीलदार,सभापती सह मुन्ना बोलेनवार, धर्मा आत्राम,तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम, वैद्यकीय अधिकारी डॉ पंडित समस्त आरोग्य कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.
हे देखील वाचा: