सण उत्सवात कोरोनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाई

सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन, ढोल, साउंड सिस्टिमवर बंदी

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत मुकुटबनसह येणाऱ्या सर्व खेडे गावात पोळा सण शासकीय नियम पाळून शांततेत पार पाडावा असे आवाहन ठाणेदार अजित जाधव यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत सांगितले. त्या वेळी परिसरातील पोलीस पाटील व शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

कोरोनाचा प्रदर्भाव रोखण्याकरिता शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे जिल्यासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आहे. कोरोना रुग्णाची संख्या वाढू नये व कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता शासनाने कोरोनाच्या नियमाचे भंग न करता पोळा व गणपती उत्सवात गर्दी टाळावी अश्या कठोर सूचना देण्यात आल्या.

पोळा सणात शेतकरी बांधवानी आपले बैल सजवून घरीच पूजा अर्चा करावी ,लोक एका ठिकाणी गर्दी करणार असे कृत्य करू नये, कोणतेही डीजे किंवा बँड लावू नये, प्रत्येकाने मस्कचा वापर करावे अश्या सूचना बैठकी दरम्यान ठाणेदार अजित जाधव यांनी दिल्या. कुणीही शासनाच्या नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.तरी सर्व जनतेनी पोलिसांना सहकार्य करून पोळा सण साजरा करावा असे ठाणेदार यांनी बैठकीत आवार्जून सांगितले

बैठकीत काही पोलीस पाटीलानी मागील वर्षी ज्या पद्धतीने पोळा सन साजरा करण्यात आला त्या पद्धतीने केल्यास कोणतीही अडचण होणार नसल्याचे सांगितले. पोळा सणा बाबत परिसरातील गावातील महितीठाणेदार यांनी पोलीस पाटलाकडून जाणून घेतल्या व कोणतीही अडचण असल्यास माहिती देण्यास सांगितले. बैठकीत सर्व पोलीस पाटील,शांतता कमिटीचे सदस्य व मंडळाचे सदस्य उपस्थित होते ते बैठकीकरिता पोलीस कर्मचारी संजय खांडेकर, प्रवीण तालकोकुलवार यांनी आयोजन केले.

हे देखील वाचा:

खड्ड्यातील पाण्यात बुडून 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.