मारेगाव पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांची बैठक

पोळा व गणपती उत्सवाच्या निमित्ताने केल्या मार्गदर्शक सूचना

भास्कर राऊत, मारेगाव: आगामी पोळा व गणेशोत्सव सणाच्या निमित्ताने मारेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत 57 पोलीस पाटील हजर होते. ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात ही बैठक पार पडली.

सण उत्सवाच्या काळात कोविड 19 चा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लवकरच पोळा आणि गणेशोत्सव हे सण आहेत. या सणानिमित्त जिल्हाधिकारी यांनी काही गाईडलाईन जाहीर केली आहे. त्या सूचने प्रमाणेच सण उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार बैठकीत ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी यावेळी पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले.

हे देखील वाचा:

खड्ड्यातील पाण्यात बुडून 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Comments are closed.