शहाबुदिदन अजाणी यांना कोर्ट ऑफ द टेबल मेम्बरशीप (COT) सन्मान

सीओटी सन्मान प्राप्त करणारे परिसरातील पहिले आणि एकमेव विमा अभिकर्ता

0

जब्बार चीनी, वणी: भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीचे वणी शाखेचे विमा अभिकर्ते शहाबुदिदन अजाणी यांना अमेरीकेच्या आंतरराष्ट्रीय एम.डी.आर.टी. ऑर्गनायझेशनचा COT – कोर्ट ऑफ द टेबल 2022 चा सन्मान प्राप्त झाला आहे. सदर सन्मान प्राप्त करनारे ते केवळ वणी परिसरातीलच नाही तर अमरावती विभागाचे प्रथम अभिकर्ता ठरले आहे. त्यांच्या या यशाबाबत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

एमडीआरटीच्या तीनपट व्यवसाय पूर्ण करणा-या अभिकर्त्यांना सीओटी हा सन्मान प्राप्त होतो. शहाबुदिदन अजाणी यांनी यावर्षी लॉकडाउन व कोरोना यासारख्या विपरीत परिस्थितीतही विक्रमी व्यवसाय करून COT – कोर्ट ऑफ द टेबल 2022 च्या मेम्बरशीपचा सन्मान मिळवला आहे.

सदर कार्य त्यांनी अवघ्या पाच महीन्यात पूर्ण केले आहे. एलआयसीच्या वणी शाखेमध्ये सुध्दा प्रथम व एकमात्र COT मेम्बर सह गॅलेक्सी क्लब मेम्बर, सुपर स्टार एजन्ट वेस्टर्न झोन, करोडपती अभिकर्ता, लाईफटाईम एम.डी. आर.टी. इत्यादी अनेक सन्मान त्यांना मिळाले आहे.

त्यांच्या या यशाबाबत अमरावती विभागाचे सिनिअर डिवीजनल मॅनेजर मलिक, वणी शाखेचे शाखाधिकारी प्रकाश झलके, विकास अधिकारी बी.बी. विटाळकर यांनी त्यांचा सत्कार केला व उज्वल भविष्या करीता शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशाबाबत परिसरात कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.