गोडाऊनमध्ये ठेवलेले रुईचे 40 बंडल चोरट्यांनी केले लंपास

वणी शहरात दिवसाढवळ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक दहशतीत 

 

जितेंद्र कोठारी, वणी : वेगवेगळ्या जीनिंग मधून सँपल जमा करून कोलकोत्ता येथे पाठविण्यासाठी ठेवलेले 600 किग्रा. रूईचे 40 बंडल दिवसाढवळ्या चोरट्याने लांबविले. जिनींग कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादवरुन वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरात चोरीच्या घटनांवर आळा बसविण्यासाठी पोलीस विभाग वेगवेगळी व्यूहरचना अमलात आणत आहे. मात्र चोरटे ‘तू डाल डाल, में पात पात’ म्हणत आपले कार्य सिद्ध करताना दिसताहेत.

फिर्यादी सत्यनारायण द्वारकाप्रसाद शर्मा (40) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते कोलकोता येथील घनकोट फायबर्स प्रा. लि. कंपनीच्या वणी ब्रांच मध्ये नोकरीवर आहे. वणी येथील वेगवेगळ्या जीनींग मधून रुईंचे सँपल जमा करून ते कोलकोता हेड ऑफिसला पाठवीत असते. 15 किलो रुईचा एक बंडल प्रमाणे त्यांनी 40 बंडल जमा करून त्यांचे राहते घरी एस बी. लॉन समोर अचल प्लाझा अपार्टमेंटच्या तळमजल्यावर असलेले टिनाच्या शेडमध्ये ठेवले होते.

बुधवार 11 ऑक्टो. रोजी फिर्यादी सत्यनारायण शर्मा हे कामानिमित्त हिंगणघाट येथे गेले. रात्री 9 वाजता परत आल्यावर त्यांनी शेडमध्ये जाऊन बघितले असता रुई  बंडल दिसले नाही. 11 तारखेला सकाळी 8 ते रात्री 9 वाजता दरम्यान अज्ञात चोरट्याने टिनाच्या शेडमधून 40 बंडल रुई किंमत 60 हजार रुपये चोरुन नेल्याची तक्रार फिर्यादी यांनी वणी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुध्द कलम 380, 461 अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.