भास्कर राऊत, मारेगाव: नवरगाव येथे शेतातील बंड्यातून कापूस चोरट्यांना मारेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचेवर कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चरणदास रामा आत्राम (30), पोतू भुतु आत्राम (40) दोघेही रा. पेंढरी, जानराव भीमा मेश्राम (62) असे आरोपींचे नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की व्यंकटेश गुरुवय्या ऐतम (52) हे नवरगाव येथील रहिवासी असून ते शेती करतात. शेतातून वेचलेला कापूस ते शेतामध्ये असलेल्या बंड्यामध्ये ठेवत असत. जागलीसाठी ते शेतातच राहत होते. दि. 29 डिसेंबरला शेतातील कापूस वेचून त्यांनी तो शेतातील बंड्यात ठेवला होता. संध्याकाळी घरी जाताना बंडा बंद करून ते घरी गेले व रात्री ते जागलीसाठी शेतात आले होते.
दुस-या दिवशी सकाळी ते बंड्यात गेले असता तिथे त्यांना बंड्यातून 2 क्विंटल कापूस (अंदाजे 14 हजार रुपयांचा) चोरीला गेल्याचे कळले. व्यंकटेश हे शेतामध्येच झोपलेले होते. रात्री शेताजवळ एक बैलबंडी संशयास्पद अवस्थेत त्यांना थांबलेली दिसली होती. सकाळी त्यांनी बैलाच्या वर्णणावरून त्यांनी तपास केला असता त्यांना ती बैलजोडी कुणाची असल्याचे कळले.
त्यावरून त्यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलीसांनी तपास करीत चरणदास रामा आत्राम, पोतू भुतु आत्राम, दोघेही रा. पेंढरी, जानराव भीमा मेश्राम यांना अटक केली असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.