कापूस वेचण्याची मजूरी २५ रुपये किलो

मजूर मिळत नसल्याने वेचणीचा भाव गगणाला

0

रफीक कनोजे, झरी: यवतमाळ जिल्ह्यात झरी तालुक्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते, पण हा कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सुरवातीला या पांढऱ्या सोन्याला 3800 रुपये भाव होता व कापूस वेचणीची मजुरी ५ ते ७ रुपये प्रति किलो होती. आता भाव वाढले व हा भावात थेट ५१५० रुपयाच्या वर येऊन ठेपला आहे. आता कापूस विकण्याची योग्य वेळ आहे .परंतु वेचणीचा भाव  मजुरांच्या कमतरतेमुळे वाढला आहे. सोबतच मजूर मिळत नसल्याने वेचणीचा मागेल तो भाव मिळत आहे. आज रोजी  10 रुपये प्रति किलो भाव देवुनही मजूर मिळत नसल्याने १५० ते २०० रुपये प्रती बाईला मजुरी देवुनही एक बाई ६ ते  ८  किलो कापुस वेचत आहे न वेचल्यास कापूस जमिनीवर पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

बळीराजा हा मोठ्या आशेने कापूस पेरणी करून उत्पन्न होणार म्हणून वाट पाहतो व त्या उत्पनातुन आपल्या मुलांचे शिक्षण, कर्ज फेडता येईल म्हणून दिवसरात्र राबतो. त्यासाठी पिकाला खत , पाणी देतो पिकांची दिवस रात्र पाहणी करून काहीतरी पदरात पडण्याची वाट पाहतो. त्यातच या वर्षी बोंड अळीने अर्ध्याहून जास्त पीक नष्ट केले. आता उरले सुरले पीक मिळेल आणि यातून काही उत्पन्न होणार या आशेवर शेतकरी आहे. मात्र मजूर मिळत नसल्याने कापूस शेतातच पडून आहे. काही शेतकरी बाहेर गावावरून मजूर आणत आहे. त्यांच्या येण्या जाण्याचा खर्चही शेतकऱ्यांलाच दयावा लागत आहे.

शेतकरी हा असा एकमेव व्यावसायिक आहे जो वर्षातून एक किंवा दोनदाच उत्पादन घेऊन वर्षभर आपला खर्च भागवितो. शिवाय हा व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतो. स्वबळावर मेहनत करून मशागत करून काहीतरी फायदा होईल या आशेवर शेतकरी जगत असतो. रात्री शेतमालाची जंगली जनावरांपासून रक्षण करण्यासाठी शेतात जाऊन जागरण करतो .इतके केल्यानंतरही काहीच मिळत नसेल तर शेती करावी की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित आहे.

 

कृषी उतपन्न बाजार समितीचे सचिव रमेश येलटीवार यांनी मुळगव्हाण येथिल शेतकऱ्यांशी केलेली बातचित पाहा…

Leave A Reply

Your email address will not be published.