वीज कोसळून गाय व वासरु ठार

नैसर्गिक संकटामुळे शेतकरी शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण

0
ज्योतिबा पोटे, वणी: मारेगाव तालुक्यातील खापरी शिवारात शेतातील बांधावर बांधुन असलेल्या गाय व वासरू वीज कोसळून ठार झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी पाच वाजताचे सुमारास घडली. यात शेतक-याचं सुमारे 12 हजारांचं नुकसान झालं आहे.
खापरी शिवारात विठ्ठल शेंडे रा.नवरगाव (धरण) यांचे मालकीचे शेत असून त्यांचेच मालकीचे गाय व वासरु शेताच्या बांधावर बांधुन होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ढगाळ वातावरण होऊन विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. याच वेळी वीज पडुन बांधावर असलेले गाय व वासरु (अंदाजे किंमत बारा हजार रुपये,) जागीच ठार झाले.
शेतकऱ्याना या नैसर्गिक आपत्तीतून वाचविण्यासाठी शासन काय उपाय योजना करणार याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे. शासन एकीकडे शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देत नाही, त्यामुळे शेतकऱ्याचा शासनावरचा विश्वास  उडाला आहे. परिसरात फवारणीमुळे होणारे शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू आणि नैसर्गीक संकटांमुळे होणारी जीवित व वित्तहाणीमुळे शेतकरी व शेतमजुरांंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.