भरधाव कारच्या धडकेत गायीला मृ्त्यू, जन्नत हॉटेलसमोरील घटना

पळ काढताना रस्त्यावर पडली कारची नंबर प्लेट

0

जितेंद्र कोठारी, वणी: एका भरधाव वेगात असलेल्या कारने गायीला जबर धडक दिली. यात गायीचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दिनांक 8 जुलै रोजी संध्याकाळी पावने 7 वाजताच्या सुमारास जन्नत होटल समोर ही घटना घडली. दरम्यान धडक देऊन पळून जाताना या कारची नंबर प्लेट खाली पडली. 

संध्याकाळी 6.45 वाजताच्या सुमारास लालगुडा दिशेकडून एक मारोती स्विफ्ट कार वणीकडे येत होती. दरम्यान जन्नत जवळ गायीचा कळप रस्ता क्रॉस करत होता. भरधाव येणा-या कारने यातील एका गायीला जोरदार धडक दिली. यात गायीत समोरील दोन्ही पाय मोडले. दरम्यान नायगाव येथील डॉ. विलास बोबडे, वणीतील दीपक रासेकर हे त्यांच्या काही सहका-यासह खासगी कामानिमित्त जन्नत हॉटेल परिसरात आले होते.

त्यांना अपघात दिसताच त्यांनी भरधाव गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण चालकाने गाडी न थांबवताच तिथून वेगाने पळ काढला. मात्र या गडबडीत त्या कारची नंबर प्लेट रस्त्यावर पडली. सदर नंबर प्लेट चेक केली असता त्यावर MH46 N7348 व त्याखाली ओम साई बाबा मोटर्स लिहिलेले आढळले. 

गायीला वाचवण्याचे प्रयत्न असफल
सदर रस्त्यावर वाहनांची वरदळ सुरू असल्याने डॉ. विलास, दीपक व घटनास्थळी असलेल्या काहींनी जखमी गायीला उचलून रस्त्याच्या कडेला जन्नत हॉटेल समोरील मोकळ्या जागेवर आणले. तिथे गायीला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र गायीचे पोट फुगले व काही वेळातच गायीचा मृत्यू झाला. गायीला वाचवता आले नाही याची त्यांनी खंत व्यक्त केली. 

घटनास्थळावर आढळून आलेली हीच ती नंबर प्लेट

सदर गायीच्या मालकाबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. घटनास्थळी आढळून आलेल्या नंबर प्लेटवरून सदर गाडी ही रायगड जिल्ह्यातील असल्याचे आढळून येत आहे. या प्रकरणी अद्याप (वृत्त लिहे पर्यंत) पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. मात्र नंबर प्लेटवरून गाडी मालकाचा नंबर शोधून त्याला कठोर शासन करावे अशी अपेक्षा गोप्रेमी व्यक्त करित आहे. 

हे देखील वाचा:

पावसाळा आला… चला झाडे लावुया, पर्यावरण वाचवुया

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.