जेव्हा प्रवासी सुविधा केंद्राचं अख्खं शेडच गायब होतं…
तेव्हा भाकपच होतं अनोखं मिलिटंट आंदोलन
भास्कर राऊत, मारेगाव: एखादी छोटी-मोठी वस्तू गायब झाली, तर त्याचं कुणाला काही विशेष कौतुक वाटत नाही. मात्र प्रवासी सुविधा केंद्राचं अख्खं शेडच गायब झालं तर? मारेगावात नेमकं हेच झालं. भारतिय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर मारेगाव शहरात शासनानं नवीन बसस्थानकासाठी जागा निर्धारीत केली. त्या ठिकाणी बसेसही थांबायला लागल्यात. ईमारत नसल्यानं प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भाकपनं सरकारी जागेवर तात्पुरतं प्रवासी केंद्राचे शेड उभं केलं. मात्र शेडच्या मागे असलेल्या भूखंड मालकानं रात्री ते शेड तोडलं आणि चोरलं असं पक्षांचं म्हणणं आहे. ही बाब कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच शेड चोरणाऱ्या इसमावर चोरीचा गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याची मागणी झाली. भाकपनं पो.स्टे.समोर धरणे आंदोलन सुरू केलं. तीन दिवस उलटुनही ठाणेदार कार्यवाही करीत नव्हते.अखेर 30 सप्टेंबर रोजी भाकपनं मिलीटंट आंदोलन केलं .वातावरण ऊग्र होत असल्यानं उपविभागीय पो.अधिकारी, ठाणेदार, तहसीलदार, बि अॅंड सी अधिकारी यांनी मोर्चेकऱ्यांची तत्काळ भेट घेतली. संबंधित इसमावर चोरीचा गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यानं मोर्चा थांबविण्यात आला. मोर्चाचं नेतृत्व वणी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार काॅ.अनिल हेपट, भाकपचे जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे, बंडू गोलर यांनी केलं.
Comments are closed.