क्रिकेट सट्टा धाड: फिंगरप्रिंट लॉक असलेल्या तळघरात चालायचा सट्टा

शहरातील बिल्डरसह चौघांवर गुन्हा दाखल, सकाळपर्यंत चालली कारवाई

0

जब्बार चीनी, वणी: रविवारी यवतमाळ येथील चमुने वणीतील वरोरा रोड वरील गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरात असणाऱ्या एका बिल्डरच्या फ्लॅटवर धाड टाकली. या धाडीत शहरातील एका बिल्डरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दुपारी 4 ते साडे चार दरम्यान सुरू केलेली कार्यवाही आज सकाळपर्यंत सुरू होती. विषेश म्हणजे आलमारीला लावलेल्या फिंगर प्रिंट लॉक असलेल्या दरवाज्याच्या आत एका तळघरात अतिशय गुप्तपणे हा सट्टा सुरू असल्याचे उघडकीस आल्याची सूत्रांची माहिती आहे.

वणी शहरातील गंगशेट्टीवर मंगल कार्यालय परिसर येथील आमिर बिल्डर्सच्या फ्लॅट स्किममध्ये ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट सिरिजवर (बॉर्डर-गावस्कर सिरिज) सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ येथील पोलिसांना मिळाली. त्यावरून रविवारी दुपारी चार ते साडे चार वाजताच्या सुमारास अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणी आमिर बिल्डर्सचे संचालक जमिर उर्फ जम्मू खान यांना ताब्यात घेऊन त्यांची रात्रभर चौकशी सुरू होती. यात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत.

फिंगर प्रिंट लॉक असलेल्या तळघरात सट्टा

सदर सट्टा फ्लॅटमध्ये अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू होता.  कुणालाही संशय येऊ यासाठी बिल्डिंगच्या खाली बिल्डरच्या फ्लॅट स्किमचे कार्यालय होते व वर सट्टा चालायचा. फ्लॅटमध्ये असलेल्या तहखान्यातून (तळघर) हा सर्व व्यवहार चालायचा. तसेच याला प्रवेशद्वार एका आलमारीतून होते. त्या आलमारीला फिंगरप्रिंट लॉक सिस्टिम लावलेली होती. केवळ ज्यांच्या फिंगरचा (बोटांच्या ठशांचा) त्याला पासवर्ड आहे अशाच व्यक्तीद्वारेच तो दरवाजा उघडला जात होता. हा गुप्त दरवाजा सायबर क्राईमच्या मदतीने उघडण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे

असा झाला सट्टा प्रकरणाचा पर्दाफाश

अलिकडेच यवतमाळ येथे पोलिसांनी काही सट्टा चालवणाऱ्या बुकींवर धाड टाकली होती. या धाडीत पोलिसांनी जे मोबाईल जप्त केले होते. त्यात पोलिसांना काही संशयास्पद नंबर आढळून आलेत. हे नंबर ट्रेस केले असता ते वणीत ऍक्टिव्ह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या क्ल्युच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली.

वराती बनूण आले पोलीस

सदर परिसर हा मंगल कार्यालयाचा परिसर आहे. त्यामुळे संशय येऊ नये म्हणून पोलिसांची चमू यवतमाळहून वराती बनूण चिंतामणी ट्रॅव्हल्सची मिनी बस घेऊन परिसरात आले. लग्नासाठी वराती आले असे समजून त्याबाबत कुणाला संशय आला नाही. कार्यालयाच्या वर गुप्त दरवाज्याच्या आत असलेल्या तळघरात धाड टाकली असता पोलिसांना तिथे सट्टा सुरू असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी पोलिसांनी शहरातील बिल्डर जमिर खान उर्फ जम्मू याला ताब्यात घेऊन त्याचा चौकशी केली. तसेच त्याच्यै मोमिनपुरा स्थित घराची पोलीसांद्वारे झडती देखील घेतली. धाड टाकताना पोलिसांनी खबरदारी म्हणून कमांडो देखील बोलवले होते. कमांडो व पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सकाळी सहावाजेपर्यंत कार्यवाही सुरू होती. दरम्यान संध्याकाळी पोलीस अधिक्षक दीलिप पाटील भुजबळ यांनी देखील घटनास्थळी भेट दिल्याची माहिती आहे.

सिमकार्ड दुसऱ्यांच्या नावावर

सट्टा खेळण्यासाठी जे 25 सिम वापरण्यात आले होते. ते सर्व सिम एका ट्रान्सुपोर्ट कंपनीच्या नावावर खरेदी करण्यात आले होते. सध्या त्या कंपनीचा शोध पोलीस घेत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी जम्मू खानसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपींवर भारतीय दंड विधानच्या कलम 420, 465, 468, 471, 25 (सी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून 38 हजार रुपये नगदी, 3 लॅपटॉप, 1 टीव्ही, 3 मोटर सायकल, संपर्क साधण्यासाठी वापरली जाणारी 2 पोपट बॉक्सची लाईन इत्यादी जप्त करण्यात आली.

पोलिसांची धडाकेबाज कार्यवा

पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही

भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचचा शेवटचा दिवस होता. त्याच दिवशी यवतमाळचे अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात ही धाड टाकण्यात आली. या चमुत सायबर क्राईमच्या एक्सपर्टसह वणीची चमुदेखील सहभागी होती. गुप्तता बाळगण्यासाठी पोलीस मिनी बस घेऊन वराती बनूण आले होते. खबरदारी म्हणून कमांडोंनाही बोलावण्यात आले होते.

(अतिरिक्त माहिती येताच न्यूज अपडेट केली जाईल.) 

Leave A Reply

Your email address will not be published.