ऑटो चालकाविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : मारेगाव तालुक्यातील एका ऑटो चालकाविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनोज महादेव कनाके रा.गोदनी ता. मारेगाव असे आरोपी ऑटो चालकाचा नाव आहे. निष्काळजीपणे ऑटो चालवून वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची प्रफुल नामदेव पावडे रा. गोदनी, ता. मारेगाव याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Podar School 2025

प्राप्त माहितीनुसार मारेगाव तालुक्यातील गोदनी येथील शेतकरी नामदेव पावडे (55) हे दम्याचा अजारेने त्रस्त होते. दिनांक 2 सप्टेंबर रोजी तब्येत बरी नसल्याने सायंकाळी 6 वाजता पत्नीला सोबत घेऊन गावातीलच तनोज महादेव कनाके यांच्या ऑटो क्रमांक MH 29 T 8750 मध्ये वणी येण्यासाठी निघाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी शहरालगत चिखलगाव परिसरात बोधे नगर जवळ रिलायंस पेट्रोलपंप समोर भरधाव ऑटो पलटी झाला. यात नामदेव पावडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता प्रथम वणी येथील सुगम हॉस्पिटल व नंतर चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दिनांक 5 सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. फिर्यादी प्रफुल नामदेव पावडे रा. गोदणी ता. मारेगाव यांची तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी ऑटोचालक विरुद्ध कलम 279, 304 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर कांबळे करीत आहे.       

Comments are closed.