होतकरू नंदिनीच्या मदतीला सरसावले CRPF अधिकारी

गरीबीवर मात करून 'टॉपर' ठरलेल्या मुलीला आधार

0

जब्बार चीनी, वणी: 12 वीच्या परीक्षेत पांढरकवडा येथील राजश्री शाहू विद्यालय व ज्यु. कॉलेजची विद्यार्थीनी नंदिनी अनिल नैताम ही कॉलेजमधून प्रथम आली आहे. ती लहाण असतानाच तिचे वडिलांचे छत्र हरवले होते. आईने लोकांच्या घरचे धुणीभांडी करत व शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत मुलीला शिकवले. तिच्या आजीनेही वयाच्या 72 व्या वर्षी मोलमजुरी करून घर चालवायला व नातीच्या शिक्षणासाठी हातभार लावला होता. याबाबत ‘वणी बहुगुणी’ने वृत्त पब्लिश केले होते. हे वृत्त वाचून मुळचे वणीचे पण सध्या नांदेड येथे सीआरपीएफमध्ये कार्यरत अधिकारी पुरुषोत्तम राजगडकर यांनी नंदिनीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलत तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.

पांढरकवडा येथील इंदिरा आवास योजना अंतर्गत मिळालेल्या एका छोट्याश्या झोपडीवजा घरामध्ये नंदिनी ही तिची आई वर्षा नैताम व तिची आजी सुभद्रासह राहते. ती दुस-या वर्गात असतानाच तिचे वडील वारले. ते ड्रायव्हर होते. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी तिच्या आई व आजीच्या अंगावर आली. परिस्थितीवर मात करत व कठोर परिश्रम घेत 10 वी मध्ये नंदिनी 92.40% गुण मिळवीत अनुसुचित जमातीमध्ये तालुक्यातून प्रथम आली होती. तर यावर्षी 12 वी मध्ये तीने (विज्ञान शाखेत) 85.00% गुण मिळवून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

याबाबत ‘वणी बहुगुणी’ने वृत्त पब्लिश केले होते. मुळचे  लालगुडा येथील व सध्या नांदेड जिल्ह्यातील सीआरपीएफच्या मुदखेड कॅम्प येथे असिस्टन्ट कमांडन्ट या पदावर कार्यरत असलेल्या पुरुषोत्तम राजगडकर यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी पांढरकवडा येथील स्थानिक पोलीस स्टेशनचे पीआय महल्ले यांच्याकडून अधिक माहिती काढली. नंदिनीच्या घरी हवालदारला पाठवून तिचे अभिनंदन केले व तिला पुढच्या शिक्षणासाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. याशिवाय राजगडकर यांनी याबाबतची माहिती त्यांच्या सहका-यांना दिली. त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी नंदिनीला जी काही शैक्षणिक मदत लागेल ती देण्याचे ठरवत तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.

नंदिनीचे स्वप्न पूर्ण करण्यास सर्वतोपरी मदत – राजगडकर
नंदिनीशी कॉलवर बोलल्यावर तिला आयएएस अधिकारी व्हायचे असल्याचे कळले. त्यामुळे तिने बीएला ऍडमिशन घेऊन आतापासून तयारी करणे गरजेचे आहे. तिला ज्या ठिकाणी राहून शिक्षण घेण्याची तयारी आहे त्या ठिकाणी तिला शिकवण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. शिवाय ग्रॅज्युएशन नंतर तिच्या एक वर्षाच्या यूपीएससी क्लासची जबाबदारीही आम्ही उचलली आहे. मी देखील परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले आहे. गुणवत्ता असूनही केवळ परिस्थितीमुळे नंदिनीसारख्या मुली शिक्षण पूर्ण करू शकत नाही किंवा मोठ्या पदावर पोहोचू शकत नाही. त्यामुळे तिचे आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी व माझ्या सहका-यांनी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.
– पुरुषोत्तम राजगडगर, असिस्टन्ट कमांडन्ट, सीआरपीएफ मुदखेड कॅम्प नांदेड

आतापर्यंत घरकूल शाळेतील शिक्षक व राजश्री शाळेतील शिक्षकांनी तिला शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली. तिच्या या यशाचे श्रेय तिची आई, आजी तसेच राजर्षी शाहू विद्यालयाचे व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना देते. विशेष म्हणजे तिच्याकडून शिक्षकांनी शिकवणीचे कोणतीही फिस घेतली नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.