व्यंकय्या नायडूंना “जय भवानी जय शिवाजी” लिहिलेली पोस्टकार्ड पाठवणार

वणीतील तरुणांचे शहरात निदर्शने

0

जब्बार चीनी, वणी: भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभा खासदारकीच्या शपथविधीदरम्यान झालेल्या प्रकारानंतर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील काही तरुणांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. दरम्यान राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना “जय भवानी जय शिवाजी” लिहिलेली तब्बल 1 हजार पोस्टकार्ड पाठविण्यात येणार, अशी माहिती आंदोलनकर्ते तरुणांनी दिली.

तुम्ही कोणत्याही पक्षाचे सदस्य असा, कोणत्याही पक्षाचे अथवा संघटनेचे समर्थक असाल तरी नायडुंच्या वागण्याचा निषेध करायचा स्वाभिमान दाखवायला हवा असे आवाहन करण्यात आले. यावेळी शुभम इंगळे, निखील झट्टे,प्रणव पिंपळे, रोहन शिरभाते, गौरव देशमुख, सौरभ कोल्हे, वैभव राजूरकर, आशिष निखाडे, सूरज नरडेवर, प्रणव हांडे, प्रतीक बोधे, शुभम चवणे, विनीत आस्कर, निखिल एकरे इ तरुण उपस्थित होते.

काय आहे हे प्रकरण?
उदयनराजेंनी बुधवारी (२२ जुलै) राज्यसभेच्या खासदारकीची इंग्रजीत शपथ घेतल्यानंतर “जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी, जय शिवाजी”ची घोषणा दिली. त्यावर नायडूंनी उदयनराजेंना समज दिली. याच प्रकारामुळे आता वाद निर्माण झाला आहे. भाजपविरोधात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर भाजपनेही याबाबत पलटवार करत काँग्रेसच्याच नेत्यांनी यावर आक्षेप घेतल्याने सभापतींनी समज दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा मुद्दा सध्या राजकारणाचा झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.