अटक वारंटमधील दहा आरोपींना अटक

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर वणी पोलीसांची मोहीम

0 1,026

विवेक तोटेवार, वणी: सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी वणी पोलिसांनी वणी व परिसरातील 10 अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. या दहाही जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते. वणी पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून या चोरट्यांच्या शोधात असल्याची माहिती आहे.

गणपती उत्सव, नवरात्र, मोहरम या सणानिमित्त शहरात शांतता राहावी म्हणून या आरोपींचे अटक वॉरंट काढण्यात आले होते. वणी पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून या आरोपीच्या शोधात होते. गुरुवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या आदेशानुसार सुनील केळकर यांच्या मार्गदर्शनात अजय शेंडे, सुशील किनाके, मिथुन राऊत, मुकेश करपते यांनी गुरुवारी रात्रभर या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.

या आरोपींना पांढरकवडा, रासा, शिबला, वरोरा, भद्रावती, वणी येथून अटक करण्यात आली. त्यांना शुक्रवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती आहे. या आरोपींवर चोरी, घरफोडी, जुगार इत्यादी गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

Comments
Loading...