चारा आणायला गेलेल्या इसमाचा मृतदेह मिळाला

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत कुंड्रा येथील घटना

जितेंद्र कोठारी, वणी : बकऱ्यांसाठी चारा आणायला जातो म्हणून घरुन निघालेल्या इसमाचा मृतदेह मिळाला. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत कुंड्रा पुरड मार्गावर ही घटना सोमवार 18 जुलै रोजा सकाळी 8 वाजता उघडकीस आली. भीमराव व्यंकटी मुद्दमवार (55) रा. कुंड्रा, ता. वणी असे मृत इसमाचा नाव आहे.

Podar School 2025

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुंड्रा येथील भीमराव मुद्दमवार सोमवारी सकाळी 6 वाजता बकऱ्यांसाठी चारा आणायला जातो असे सांगून घरुन निघाला होता. मात्र सकाळी 8 वाजता दरम्यान कुंड्रा पुरड मार्गावर कुंड्रापासून काही अंतरावर रस्त्यालगत त्याचा मृतदेह मिळाला. मृतक भीमराव याला फिट येण्याचा आजार असल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. शिरपूर पोलिसांना मृतदेहाचा पंचनामा करुन वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.