विजेच्या जिवंत तारांचा स्पर्श झाल्याने 3 जनावरांचा मृ्त्यू

दोन जनावरांना वाचवण्यात यश, डोंगरगाव येथील घटना

0

नागेश रायपुरे, मारेगाव: वादळामुळे शेतात पडलेल्या उच्च दाबाच्या इलेट्रिक तारांना जनावरांचा स्पर्श होऊन त्यात 3 जनावरांचा मृत्यू झाला. डोंगरगाव (वेगाव) शिवारात ही घटना घडली. या अपघातात पशूपालक शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान 2 जनावरांना वाचवण्यात नागरिकांना यश आल्याने आणखी नुकसान होणे टळले.

तालुक्याती डोंगरगाव (वेगाव) शेत शिवारा चंद्रकांत अडबायले यांच्या मालकीचे शेत आहे. दरम्यान रविवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान परिसरात वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. त्यांच्या शेतातील उच्च दाबाच्या इलेक्ट्रिक तारा तुटून जमिनीवर पडल्या होत्या. मात्र ही घटना कुणाच्या लक्षात आली नाही.

सोमवारी गावातील संदीप बोबडे व मंगेश झोलबे यांचे जनावरे शेतात चरायला गेले होते. दरम्यान शेतात पडलेले जिवंत इलेक्ट्रिकच्या जिवंत तारांना तिथे चरत असलेल्या 5 जनावरांना स्पर्श झाला. विजेचा धक्का लागताच जनावरांनी ओरडणे सुरू केले.

दरम्यान परिसरातील शेतातील शेतकरी घटनास्थळाकडे धावून गेले. मात्र तो पर्यंत 3 जनावरे जागीच ठार झाली होती. तर तारांना चिपकलेल्या 2 जनावरांना वाचविण्यात त्यांना यश आले. ऐन शेतीच्या हंगामाच्या तोंडावर शेतक-यांच्या जनावरांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

हे देखील वाचा:

सावधान: वणी तालुक्यात म्युकर मायकोसिसचा शिरकाव

प्रियकराच्या प्रेमाला आला चांगलाच बहर, प्रेयसी गर्भवती होताच केले हात वर

 

Leave A Reply

Your email address will not be published.