उकणीची जिल्हा परिषद शाळा ते त्रिपु-यातील NIT चा प्रेरणादाई प्रवास

उकणीचे अनिल शंकर कातरकर यांना आचार्य पदवी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील उकणी येथील अनिल शंकर कातरकर यांना ‘थर्मल इंजिनिअरिंग सायन्स’ या विषयातील संशोधनासाठी नुकतीच आचार्य (Ph.D.) पदवी जाहिर झाली आहे. अनिल यांनी त्रिपूरा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) आगरतळा, येथून पीएचडी पूर्ण केली आहे. प्रा. डॉ. स्वपन भोमिक यांच्या मार्गदर्शनात त्यांनी थर्मल इंजिनिअरिंग या विषयातील संशोधन पूर्ण केले.

अनिल शंकर कातरकर हे मुळचे उकणी येथील असून ते एका शेतकरी कुटुंबातून आलेले आहे. त्यांच वडील शंकर कातरकर हे वेकोलित नोकरीला आहे. तर आई गृहिणी आहे. अनिल हे सध्या पुणे येथे स्थायिक आहे. उकणीची जिल्हा परिषद शाळा ते त्रिपु-यातील NIT असा अनिल यांचा प्रवास प्रेरणादाई आहे. त्यांनी जि.प. शाळा उकणी येथून प्राथमिक तर नवभारत हायस्कूल उकणी येथून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर येथील साई पॉलिटेक्निक येथून पॉलिटेकनिक तर निलंगा येथून मेकॅनिकल या ब्रँचमध्ये बीई केले. पुण्यात 3 वर्ष जॉब केल्यानंतर त्यांनी पीएचडीसाठी अप्लाय केले होते. त्यांना MHRD ची फेलोशिप देखील मिळाली आहे.

अनिल कातरकर यांचे 20 शोध प्रबंध अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहे. याशिवाय चार आतंरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे यांत्रिकी अभियांत्रिकीत कातरकर यांच्या नावे तीन पेटंटची नोंद आहे. सध्या त्यांना नोकरीसाठी अनेक कंपनीच ऑफर असली तरी परदेशात जाऊन रिसर्च क्षेत्रात कार्य करण्याचा मानस त्यांनी ‘वणी बहुगुणी’कडे व्यक्त केला आहे.

कुटुंबीयांची साथ मोलाची – डॉ. अनिल कातरकर
कुटुंबापासून दूर राहून भारताच्या दुस-या टोकाला जाऊन शिक्षण घेणे हे मानसिक दृष्ट्या सोपे नव्हेत. मात्र यात कुटुंबीयांची मोठी लाभ लाभली. कामात प्रामाणिक राहल्याने यश मिळाले. विद्यार्थ्यांनी जर प्रामाणिक राहून काम केले तर यशाला नक्कीच गवसणी घालता येते. माझ्या या यशात प्रत्येकाचा वाटा आहे. त्यामुळे हे यश त्यांचेच आहे. गावखेड्यातील विद्यार्थ्यांना रिसर्च क्षेत्रात येण्यासाठी यापुढे मार्गदर्शन करणार. 

इंजिनिअरिंग विषयात खूप कमी व्यक्ती पीएचडी करतात. जिल्हा परिषदेचे दादाजी खुसपुरे, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक शंकर वेलेकर, कुचनकर सर, तसेच नवभारत हायस्कूलाचे प्राचार्य भय्याजी खाडे यांनी शिकण्याची गोडी निर्माण केल्याचे अनिल सांगतात. आई-वडील, भाऊ अमोल व सुधीर कातरकर, पत्नी काजल कातरकर, मुलगा अयांश कातरकर, मोहन बल्की, अजय पिंगळे, विश्वजित मुजूमदार, किशोर पावडे, प्रकाश पायपरे, कुटुंबिय यांना ते आपल्या यशाचे श्रेय देतो. अनिल यांच्या यशाबद्दल परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.