वणी तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात मागील 15 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यात हजारो हेक्‍टरवरील पिकांची नासाडी झालेली आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील कापसाची बोंडे सोडत आहे. सोयाबीनला कोंब फुटले आहे तसेच तुरीचे नुकसान झाले आहे. मागील 3 वर्षांपासून सतत नापिकी असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. यंदा वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला प्राधान्य दिले. मात्र पावसामुळे सोयाबीन पूर्णपणे करपली आहे. त्यातच केंद्र शासनाने सोयाबीन आयात करण्याची मंजुरी देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे वणी तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावा.

अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस वणी तर्फे करण्यात आली आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी वणी याना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा, वणी विधानसभा अध्यक्ष जयसिंग गोहोकार, शहर अध्यक्ष राजाभाऊ बिलोरिया, राकांप तालुका अध्यक्ष सुर्यकांत खाडे, जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई आगबत्तलवर, महिला शहर अध्यक्ष सविता ठेपाले, मारोती मोहाडे, रामकृष्ण वैद्य .मारोती मोवाडे, गजेंद्र काकडे, किशोर ठेंगणे, राजेंद्र जेनेकर, पद्माकर देवाळकर ,बकमलाकर देवाळकर, सुनील पानघाटे , राजू उपरकर उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

Comments are closed.