जितेंद्र कोठारी, वणी: शासन व सेवाभावी संस्थांकडून गरजू व गरीब कुटुंबाना रेशनकिटचे वाटप केले जात आहे, मात्र नाभिक समाज शासनाच्या सर्व योजने पासून वंचित आहे. त्यामुळे शासनाने नाभिक समाजाच्या समस्येकडे जातीने लक्ष देऊन आथिर्क मदत करावी जेणेकरून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही. या आशयाचे निवेदन वणी तालुक्यातील बोदाड येथील नाभिक समाज बांधवातर्फे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार याना देण्यात आले.
कोरोना महामारीच्या अनुषंगात लॉकडाउनमुले मागील दीड महिन्यापासून सलून व्यावसायिकांची दुकाने बंद असून नाभिक समाज बांधव व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. हेअर कटिंग, सलून, ब्युटीपार्लर व्यावसायिकांची बहुतांश दुकाने भाडेतत्वावर असून तब्बल 40 दिवसापासून दुकाने बंद असून दुकानांचे भाडे थकीत झाले आहे. सलूनच्या माध्यमातून कोरोना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे शासनाने सलून दुकाने उघडण्यास किंवा व्यवसाय करण्यास सक्त मनाही केलेली आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे, असे निवेदना म्हटले आहे.
निवेदन देताना बोदाड येथील ग्राम पंचायत सदस्या भारती प्रवीण जांभूळकर, अमोल जांभूळकर, विठ्ठल हनुमंते, रंजित घुमे, आकाश हनुमंते, अर्चनाताई कडुकर, अभय सुरसे, प्रवीण शेंडे, सुनील जांभूळकर, संजय सूर्यवंशी, शंकर हनुमंते व इतर नाभिक समाजाचे नागरिक उपस्थित होते .