गिरीश कुबडे, वणी: वणी लगत असलेल्या गणेशपूर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी प्रक्रिया प्रकल्प (वॉटर प्रोसेस प्लॉन्ट) आहे. आधीच पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या उपस्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली आहे. यातून भविष्यात पाण्याची तीव्र टंचाई भासू शकते. शिवाय वॉटर प्रोसेस प्लॉन्टमधून निघालेल्या दुषित पाण्याची योग्य प्रक्रिया न करता विल्हेवाट लावली जात नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरात असलेले वॉटर प्रोसेस प्लॉन्ट ताबडतोब बंद करावे अशी मागणी गणेशपूरच्या ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसिलदारांना केली.
यावर्षी कमी पावसामुळे पाण्याची पातळी पूर्वीपेक्षा खोल गेली आहे. मात्र पाणी प्रकिया व्यवसायिक आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात गणेशपूर ग्रा.प. हद्दीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करीत आहे. हा परिसर औद्धोगिक क्षेत्रात नसतानाही इथं मोठ्या प्रमाणात वॉटर प्लॉन्ट सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या वॉटर प्लॉन्टवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी गणेशपूरवासियांनी केली आहे.