मराठा आरक्षण कायम ठेवावे, काँगेस कमिटीची मागणी
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप
सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, व सर्व काँग्रेस सेलचे आजी, माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शनिवारी मराठा आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी आंदोलन करत तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. राज्यातील ओबीसीचे आरक्षण रद्द होण्यास मोदी सरकार व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हेच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे.
सुप्रीम कोर्टाने ओबीसी समाजाची आकडेवारी (एम्परिअल डाटा) मागितली होती. केंद्रातील मोदी सरकारनी न दिल्यामुळे व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हेकेखोरपणा मुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टा कडून रद्द झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास जबाबदार असलेल्या भाजप मोदी केंन्द्र सरकार, व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा निषेध करून धरणे आंदोलन करण्यात आले.
तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन मराठा आरक्षण कायम ठेवावे अशी मागणी झरी तालुका काँग्रेस तर्फे तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे संचालक राजू येल्टीवार, महिला अध्यक्ष संगीता नाकले, माजी अध्यक्ष भूमरेड्डी बाजनलावार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संदीप बुरेवार, सरपंच निलेश येल्टीवार, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल दांडेकर, भगवान चुकलवार, केशव नाकले, हरिदास गुर्जलवार, सचिन टाले व निखिल चौधरी यांनी मागणी केली.
हे देखील वाचा: