फेसबूकवर ओळख, व्हॉट्सअपवर नग्न होण्याची मागणी

महिलेचा काढला नग्न व्हिडीओ, ब्लॅकमेल करणा-या तरुणावर गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: त्या दोघांची फेसबूकवर ओळख झाली. महिला विवाहित होती. मात्र ती त्याच्या जाळ्यात अडकली. दोघांमध्ये व्हिडीओ कॉल व्हायचे. एक दिवस त्याने तिला नग्न होऊन व्हिडीओ कॉल करण्याचा आग्रह धरला. मात्र यातच ती अडकली. त्याने त्याचा व्हिडीओ तयार करून तिला ब्लॅकमेल करणे सुरु केले. तिचा व्हिडीओ मित्राला पाठवला. ही घटना वणीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पीडित महिला ही वणी शेजारील एका गावातील रहिवासी असून ती विवाहित आहे. काही दिवसांआधी तिची फेसबूकवरून वाजिद हुसेन (39) रा. मोमीनपुरा वणी याच्याशी ओळख झाली. तेव्हापासून त्यांच्या चाटींग सुरु होती. पुढे ते एकमेकांशी व्हॉट्सअपवर बोलायचे, व्हिडीओ कॉल करायचे. त्यातून त्यांच्यात प्रेमसंवाद सुरु झाला. एक दिवस त्याने पीडित महिलेला व्हिडीओ कॉलवर नग्न होण्याची मागणी केली. पीडितेने नकार दिल्यावर वाजिदने तिचे प्रेमसंबंध तिच्या पतीला सांगणार अशी धमकी दिली.

पीडिता नग्न झाल्यावर वाजिदने त्याचा व्हिडीओ तयार केला. मात्र त्याने सदर व्हिडीओ त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीला पाठवला. अलिकडेच त्याने तू जर माझ्यासोबत संबंध ठेवले नाही, तर तुझा व्हिडीओ पती व तुझ्या नातेवाईकांमध्ये व्हायरल करतो अशी धमकी दिली. जर संबंध ठेवले नाही तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

पीडितेने पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी वाजित हुसैन (39) याच्याविरोधात बीएनएसच्या कलम 75, 77, 351(2) व आयटी ऍक्टच्या कलम 66 (E) अंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास ठाणेदार गोपाळ उंबरकर यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

प्रेमनगरमध्ये एकीचा ग्राहक दुसरीने पळवला, सेक्स वर्करला मारहाण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.