प्रेमनगरमध्ये एकीचा ग्राहक दुसरीने पळवला, सेक्स वर्करला मारहाण

ग्राहक पळवण्याचा वाद पोहोचला हाणामारीपर्यंत, ग्राहकांमध्ये दहशत..

बहुगुणी डेस्क, वणी: शेजारी असलेल्या एका दुकानदाराचा ग्राहक दुस-या दुकानदाराने पळवल्याने दोन दुकानदारात वाद होणे हे काही नवीन नाही. मात्र वणीतील प्रेमनगरमध्ये एक आगळावेगळा वाद समोर आला. शनिवारचा दिवस होता. बाजारपेठ बंदचा दिवस असल्याने ‘रंगेल’ ग्राहकांची प्रेमनगरकडे पावलं वळली होती. प्रेमनगरमध्ये एका ग्राहकाला एकाच वेळी दोन वारंगणाकडून ऑफर आली. ‘गि-हाईक’ दुसरीकडे गेला. मात्र एकीचा गि-हाईक दुसरीने पळवल्याने दोन वारंगणात चांगलाच वाद झाला. हा वाद वाढून मारहाणीपर्यंत पोहोचला. या प्रकरणी एक वारांगणा जखमी झाली. ग्राहकांवरून झालेला वाद आता हाणामारी पर्यंत पोहोचल्याने ग्राहकवर्गात खळबळ उडाली असून त्यांच्यात चांगलीच दहशत पसरली आहे.  

तक्रारीनुसार, वणीतील जत्रा मैदानानजीक प्रेमनगर ही वारांगणा वस्ती आहे. रेड लाईट एरीया व झेडपी म्हणून देखील हा एरिया कुप्रसिद्ध आहे. येथे छम्मो (नाव बदललेले) ही 35 वर्षीय वारांगणा (सेक्स वर्कर) देहविक्रीचा व्यवसाय करते. तिच्या घराशेजारीच चिंकी (नाव बदललेले) वय 28 ही राहत असून ती देखील याच व्यवसायात आहे. दोघींचे घर आसपासच असल्याने गेल्या काही दिवसांपासून या दोघीत ग्राहक पळवण्यावरून वाद आहे.

शनिवारी दिनांक 7 जून संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास वारंगणा ग्राहकांची वाट बघत खूर्चीवर बसून होत्या. दरम्यान तिथे एक ग्राहक आला. ग्राहक चिंकीकडे गेला. दरम्यान छम्मोने त्या ग्राहकाला ‘इधर आओ’ असा आवाज दिला. त्यावर चिंकी चिडली व तिने छम्मोकडे जात तू माझ्या ग्राहकाला आवाज देऊन का बोलावते, माझा ग्राहक का पळवते अशी विचारणा केली. दोघीतला वाद वाढत जाऊन शिविगाळ पर्यंत पोहोचला.

दरम्यान चिंकीसोबत एक इसम होता. त्याने बाजूला ठेवलेली खूर्ची उचलली व छम्मोच्या डोक्यात घातली. य मारहाणीत तिच्या डोक्या डोक्याला व छोपराला ईजा झाली. त्यानंतर चिंकी व तिच्या सोबतच्या इसमाने छम्मोला जीवे मारण्याची धमकी दिली. छम्मोने रात्रीच पोलीस स्टेशन गाठले व या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी चिंकी व तिच्या साथीदारावर बीएनएसच्या कलम 118 (1), 351 (2), 351 (3) व 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. दरम्यान ग्राहक कुणाकडे गेला हे कळू शकले नाही, पण या घटनेमुळे ग्राहकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. 

फेसबूकवर ओळख, व्हॉट्सअपवर नग्न होण्याची मागणी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.