दत्तात्रेय सुरावार यांचे उपचारादरम्यान वणीत निधन
आज 10 जुलै रोजी दुपारी 3 वाजता मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार
बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक एसपीएम शाळेतील सेवानिवृत्त मुखाध्यापक दत्तात्रेय बापुराव सुरावार (82) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. 9 जुलैच्या मध्यरात्री त्यांची प्रकृती खालावली. उशिरा रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. सामाजिक कार्यकर्ते मनीष सुरावार यांचे ते वडील होते. त्यांच्यावर स्थानिक मोक्षधाम येथे गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी दुपारी 3 वाजता अंतिम संस्कार होतील. त्यांच्या पश्चात आशुतोष, संतोष, मनीष ही तीन मुलं, सुना, नातवंड असा बराच आप्त परिवार आहे. अत्यंत मनमिळावू, शिस्तप्रिय अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या जाणाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Comments are closed.