वणीत आशा कर्माचा-यांचे तहसीलजवळ धरणे व निदर्शने आंदोलन

आशाच्या आंदोलनाला माकप व किसान सभेच्या पाठिंबा

0

जब्बार चीनी, वणी: गेल्या ७ दिवसांपासून राज्यातील आशा कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांना घेऊन संपावर आहेत. त्याच संपचे अनुषंगाने आपल्या मागण्या तीव्रतेने रेटण्यासाठी “सिटू” संघटनेच्या माध्यमातून वणी येथे दि. २२ जून रोजी एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन करीत प्रचंड नारेबाजी करीत सरकारच्या धोरणाच्या निषेध करण्यात आला. आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना (सिटू) चे वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्या करण्यात आल्या. गतप्रवर्तकांना दरमहा २२ हजार ₹ व आशांना दरमहा १८ हजार ₹ किमान वेतन देण्यात यावे, प्रोत्साहन भत्ता प्र. दिवस ५०० ₹ देण्यात यावा, आशा व गटप्रवर्तकाची कायम नियुक्ती करावी, गटप्रवर्तकांना किपिंगचे ३००० ₹ देण्यात यावे, आशांना आरोग्य वर्धिनीचे मानधन देण्यात यावे, आशा व गटप्रवर्तकांना स्वतंत्र कार्यालय मिळावे आदी मागण्या यावेळेस करण्यात आल्या.

या आशा व गटप्रवर्तक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिटू संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. शंकरराव दानव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. कुमार मोहरमपुरी व किसान सभेचे कॉ. ऍड. दिलीप परचाके हे आंदोलनात सहभागी झाले होते.

या आंदोलनाचे नेतृत्व प्रीती करमनकर, मेघा बांडे, प्रणाली कुचनकर, माधुरी पारेलवार, किरण बोनसुले यांनी केले. या आंदोलनात प्रामुख्याने नमा पथाडे, चंदा मडावी, अनिता जाधव, अनिता काळे, सुनीता कुंभारे,ईशा भालेराव, रिजवाना शेख, सोनाली निमसटकर, चंदा पथाडे, कल्पना मजगवली, आदींनी सहभाग घेतला होता.

हे देखील वाचा:

सायकलवरून पुलाच्या खाली पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

वणीत ओबीसी महासंघातर्फे गुरूवारी निदर्शने आंदोलन

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.