पगार थकवल्याने आरसीसीपीएल कंपनीच्या कामगारांचे धरणे आंदोलन

4 महिन्यांपासून 150 ते 200 कामगारांचा पगार थकीत

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेंट कंपनीतील ठेकेदाराने कामगारांचा पगार थकीत ठेवल्याने कामगार संतप्त झाले. याविरोधात रविवारी कर्मचा-यांनी कंपनीच्या गेटवर धरणे आंदोलन केले. आरसीसीपीएल कंपनीतील हाजीबाबा इन्फ्रा व बिलमेट या दोन कंपनीकडे मनुष्यबळाचे कंत्राट आहे. या दोन्ही कंपनीने 150 ते 200 तरुणांना नोकरी दिली आहे. परंतु गेल्या 4 महिन्यांपासून दोन्ही कंपनीचे काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे एकाही कामगारांचे पगार झालेले नाही. त्यामुळे कामगार संतप्त झाले आहे.

मुकुटबन मध्ये आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सिमेंट फॅक्टरीचे काम गेल्या 3 वर्षांपासून युद्धपातळीवर सुरू असून पूर्णत्वास होण्याच्या मार्गावर आहे. आरसीसीपीएल कंपनीचे अनेक कामाचे कंत्राट इतर कंपनीला दिले आहे. या कंत्राटदाराखाली परिसरातील लहान लहान कंत्राटदार काम करीत आहे. तर या लहान कंत्राटदारांच्या हाताखाली परिसरातील बेरोजगार तरुण काम करीत आहे. यात सुपरवायझर व कामगार यांचा समावेश आहे. आरसीसीपीएल कंपनीत तालुक्यातील 1500 ते 2000 कामगार काम करीत आहे.

हाजीबाबा इन्फ्रा व बिलमेट या दोन कंपनीने कामगारांचे पगार थकीत ठेवल्याने समाजसेवक मंगेश पाचभाई यांनी दोन्ही कंपनीच्या विरुद्ध धरणे आंदोलन करण्याचे ठरविले. 21 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून दोन्ही कंपनीतील 150 ते 200 कामगारांनी आरसीसीपीएल कंपनीच्या गेट नं 2 च्या गेटवर धरणे आंदोलन केले.

आंदोलनात राहुल निमसटकर, मंगेश पाचभाई, प्रसाद दुर्गे, गजानन गंधेवार यांनी कामगारांचे 4 महिन्याचे पगार त्वरित देण्यात यावे, काम बंद झाल्याने जे तरुण बेरोजगार झाले त्यांना पुन्हा कामावर घ्यावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या रेटून धरल्या. व जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा घेण्यात आला.

अखेर 10 वाजता आरसीसीपीएल कंपनीचे एच आर प्रमुख जयंत व्यास व दिनेश अडकीने यांच्याशी पुढाकार घेणारे प्रमुख यांच्या सोबत चर्चा करून कंपनीने 4 ते 5 दिवसात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. कंपनीच्या गेटवरील धरणे आंदोलन बाबत राजकीय पुढारी व काही लोकप्रतिनिधी तथा अधिकारी यांना माहिती देऊन सुद्धा तरुणांच्या मदतीकरिता आले नसल्याने तरुण बेरोजगार कामगारात मोठ्या प्रमाणात नाराजी पहायला मिळाली.

मुख्य कंत्राटदारांनी थकवले सब कॉन्ट्रॅक्टरचे पैसे
कंपनीतील विविध ठेकेदाराकडून येणार असलेले थकबाकी धानी इंटरप्राइजेस 8 लाख, सॅम इंटरप्राइजेस 10 लाख, स्वरा इंटरप्राइजेस 3 लाख, अभिषेक इंटरप्राइजेस 75 हजार, अनिल देऊळकर 2 लाख 32 हजार, अनिता कन्स्ट्रक्शन 1 लाख 50 हजार, पलक इंजिनीयरिंग 3 लाख, प्राची इंजिनियरिंग 3 लाख 50 हजार, क्यू 3 कन्स्ट्रक्शन मटेरियल 3 कोटी, किराया 86 लाख, चेतू मिनी ट्रान्सपोर्ट 86 हजार श्री साई ट्रान्सपोर्ट 50 हजार व अजय पासवान 5 लाख 35 हजार असा एकूण 5 कोटी रुपये कंपनीनिकडून येणे असल्याने लहान मोठे ठेकेदार कामगार मोठ्या अडचणीत सापडले आहे.

हे देखील वाचा:

सायकलवरून पुलाच्या खाली पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

अवैध दारूविक्रेत्याला लिंगटीवासीयांनी शिकवला धडा

Leave A Reply

Your email address will not be published.