रसायनशास्त्र विभागाची वर्च्युअल क्लासरूम सुरू
विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास व सराव परीक्षा
विवेक तोटेवार, वणी: कोविड-19 मुळे सध्या कॉलेजमधील क्लास बंद आहे. पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ सुनंदा आस्वले यांनी बी. एस्सी. भाग 2 व 3 च्या विद्यार्थ्यांसाठी गूगल क्लास रुम तयार केली.
या वर्च्युअल क्लासरूममध्ये विविध विषयावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, व्हिडिओ क्लिप्स तसेच युट्यूबवर काही व्हिडीओ क्लिप्स बनवून अपलोड केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या विषयाचा अभ्यास करून ऑनलाइन दिलेली वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका सुध्दा सोडवता येते. या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांनी केले आहे.