लहान भावाने मोठ्या भावाला फावड्याने ठेचले

कौटुंबिक वादातून रक्तरंजित घटना, एक गंभीर

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील देवाळा गावात शनिवारी सकाळी एका कौटुंबिक वादातून भावाने दुसऱ्या भावावर फावड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Birthday

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तक्रारीनुसार, अनिल बाबाराव बावने (वय 35) हे मारेगाव तालुक्यातील देवाळा येथील रहिवासी आहे. त्यांचा लहान भाऊ सुनिल बाबाराव बावने (वय 30) हा देखील त्यांच्या सोबतच राहतो. शनिवारी दिनांक 23 मे रोजी सकाळी सुमारे 7 वाजता राहत्या घरी अनिलला त्याच्या लहान भावाने फावड्याने मारहाण केली. हल्ल्यात अनिल बावने याच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून तो रक्तबंबाळ अवस्थेत घरातील हॉलमध्ये पडला होता. हल्ल्यानंतर सुनिलने पळ काढला. मात्र काही वेळाने तो पुन्हा घरी आला व त्याने पुन्हा फावड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान घटनेची माहिती गावात पसरली. फिर्यादी रामदास संभाजी बावने (वय 76) हे घटनास्थळी पोहोचले. जखमी अनिल बावने याला प्रथम मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हल्ल्याचे कारण कळू शकले नाही. मारेगाव पोलिसांनी आरोपी सुनिल बावने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Comments are closed.