शिक्षकांच्या मागणीसाठी भरवली बिडीओंच्या कक्षातच शाळा
शिक्षक न मिळाल्यास 15 ऑगस्टला ठोकणार शाळेला टाळे, पालकांचा इशारा
दरम्यान गटविकास अधिकारी राजेश गायनार यांनी येत्या 10 तारखेला यावर विचारविमर्श करून तोडगा काढण्याचे आश्वासन संबधीताना दिले. मात्र पालकांचे समाधान झाले नाही. त्यांनी येत्या 10 तारेखेला शिक्षक न दिल्यास 15 आॅगष्टला स्वातंत्र्यदिनी शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
वणी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सध्या भोंगळ कारभार दिसून येत आहे. समायोजनात अनेक त्रृटी असल्याचा आरोप होतोय. मर्जीतील शिक्षकांसाठी काही खास जागा सुध्दा सोडण्यात आल्या, तसंच मर्जीतील शिक्षकांना जवळचे गावे मिळण्यासाठी येथील अधिका-यांनी खटाटोप केल्याचा आरोप होतोय. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामीण भागातील शाळा ओस पडत आहेत. शिक्षक नसल्यानं कित्येक पालक त्यांच्या मुलांना बाहेरगावात शिक्षणासाठी पाठवत असल्याचं दिसत आहे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे.