पुरुषोत्तम नवघरे, वणी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त रविवारी दिनांक 24 डिसेंबर रोजी धम्मक्रांती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एस.पी.एम. हॉयस्कूलच्या मागील खुले मैदान, भीमनगर येथे संध्याकाळी 5 ते रा. 10 यावेळेत हा मेळावा होणार आहे. संविधान जागर सन्मान मंच, वणीच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात बुद्धिस्ट सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे. ‘बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था’ या विषयावर ते आपले विचार व्यक्त करणार आहेत. या कार्यक्रमाचे उदघाट्क विलास वाघमारे राहणार असून स्वागतध्यक्ष गौरीशंकर खुराणा राहणार आहेत. कार्यक्रमाला दिनेश हनुमंते राज्य अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्यासह वैभव धबडगे, सतीश इंगोले, अंकुश माफूर, सुजाता प्रभाकर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. परिसरातील समाज बांधवानी या मेळाव्याला हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.