धनोजे कुणबी संस्थेची नवीन कार्यकारिणी गठित
अध्यक्ष राजेश पहापळे तर संजय पेचे यांची सचिव म्हणून निवड
तालुका प्रतिनिधी, वणी: वणी येथील धनोजे कुणबी समाज संस्थेची नवीन कार्यकारणी नुकतीच गठित करण्यात आली. अध्यक्ष म्हणून राजेश पहापळे, उपाध्यक्ष जितेंद्र बोर्डे, सचिव संजय पेचे, सहसचिव अशोक चिकटे, कोषाध्यक्ष आशिष मोहितकर, मार्गदर्शक प्रा. बाळकृष्ण राजूरकर तर संचालक म्हणून अनंत एकरे, नामदेव जेनेकर, रमेश पेचे, रामराव गोहोकर, प्रा. नितीन मोहितकर, नरेंद्र मिलमीले, गोविंद थेरे, प्रमोद वासेकर, पुंडलिक ठावरी, संजय पोटे, मुरलीधर भोयर, धिरज डाहुले, अमोल टोंगे यांचा समावेश आहे.
Comments are closed.