सायकलवरून पुलाच्या खाली पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

पळसोनी (मुर्धोनी) येथील घटना, डिव्हायडरवर पाय ठेवताना गेला तोल

1

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील पळसोनी (मुर्धोनी) येथील एका चिमुकल्याचा सायकलवरून पुलाखाली पडल्याने मृत्यू झाला. आज दिनांक 22 जून रोजी दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. पुलावरील डिवायडरवर सायकलवरून पाय ठेवताना बॅलन्स गेल्याने हा अपघात घडला.

प्राप्त माहिती नुसार, प्रज्ज्वल दिनेश गुरनुले (12) हा पळसोनी (मुर्धोनी) येथील रहिवाशी होता. त्याचे वडील हे ट्रक ड्रायव्हर आहे. आज मंगळवारी दिनांक 22 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास प्रज्ज्वल घरून सायकल घेऊन बाहेर फिरायला गेला. गावाच्या वेशीवरच पळसोनी व मुर्धोनी या गावाला जोडणारा पूल आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सायकलने फिरता फिरता प्रज्ज्वल हा सदर पुलाजवळ पोहोचला. पुलावर सायकल थांबवण्यासाठी त्याने डिव्हायडरवर पाय ठेवला. मात्र पाय ठेवत असताना त्याचा तोल गेला व तो पुलाखाली मानेवरच पडला. या अपघातात त्याच्या मानेला जबर दुखापत झाली. घटना घडताच जवळ असलेल्या काहींनी प्रज्ज्वलला वर काढले. त्याच्या वडिलांनी एका व्यक्तीला सोबत घेऊन प्रज्ज्वलला वणीतील एका खासगी रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

पळसोनी-मुर्धोनीत हळहळ
सर्वांशी हसत खेळत व मिळून मिसळून राहणा-या प्रज्ज्वलच्या एकाएकी दुर्दैवी मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. आज संध्याकाळी प्रज्ज्वलवर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अपघात झालेल्या पुलाला कठडे नाही त्यामुळे इथे अनेकदा छोटे मोठे अपघात झाले आहे. जनावरे तसेच 2-3 लहान मुलेही या पुलावरून खाली पडल्याची माहिती गावक-यांनी दिली.

हे देखील वाचलेत का?

1 Comment
  1. […] सायकलवरून पुलाच्या खाली पडून चिमुकल्… […]

Leave A Reply

Your email address will not be published.