स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

करणवाडी येथील घटना, कधी थांबणार मारेगाव तालक्यातील आत्महत्येचे सत्र?

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्याचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. आज पुन्हा एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर घटना करणवाडी शिवारात सकाळी 6 ते 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तुळशीराम पांडुरंग कळसकर (66) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मारेगाव तालक्यातील आत्महत्येचे सत्र कधी थांबणार? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. 

मृतक तुळशीराम कळसकर हे करणवाडी येथील रहिवाशी होते. त्याच्याकडे सुमारे 8 एकर कोरडवाहू शेती होती. तुळशीराम हे काल सोमवारी दिनांक 21 जून रोजी मध्यरात्री घरून निघून गेले होते. दरम्यान पहाटेच्या सुमारास ते घरी नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी शोधा शोध केली मात्र ते आढळून आले नाही. त्यामुळे ते शेतात गेले असावे असे गृहीत धरून त्यांचे कुटुंबीय व परिचित शेतात गेले. मात्र तिथे पळसाच्या झाडाला त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. 

Birthday ad 1
Birthday ad 2

मृतकाचे आत्महत्याचे कारण कळू शकले नाही. मात्र त्यांच्यावर बॅंकेचे व खासगी कर्ज असल्याने ते गेल्या अनेक दिवसापासून तणावात असल्याचे निकटवर्तीय बोलत आहे. त्याचे मागे पत्नी, 2 मुलं, 1 विवाहित मुलगी असा मोठा आप्तपरिवार आहे. या घटने मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा:

पोस्ट ऑफिसच्या गेस्टरूममध्ये कर्मचा-याची आत्महत्या

आता तालुक्यात अवघे 7 ऍक्टिव्ह रुग्ण, आज 1 पॉझिटिव्ह

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!