बहुगुणी डेस्क, दिग्रस: परिसरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना त्वरित वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत यादृष्टिने इथे कोवीड रुग्णालय सुरू झाले. केमिस्ट भवन येथे उभारण्यात आलेल्या दिग्रस कोवीड हॉस्पिटलचे लोकार्पण तहसीलदार राजेश वजीरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव टाले, पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांच्या संयुक्त हस्ते
या सोहळ्याला नगर परिषदेचे उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे, नगरसेवक केतन रत्नपारखी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. सी. बानोत, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय गोविंदवार, डॉक्टर असोसिएशनचे डॉ. चंद्रशेखर भोंगाडे, निमाचे अध्यक्ष डॉ. यशवंत राऊत, डॉ. सुधाकर आसेगावकर, डॉ.अशोक नालमवार, सुधीर देशमुख, राहुल शिंदे ,डॉ. श्रीकृष्ण खोलगडे, डॉ.मुरलीधर राठी, मेडिकल असोसिएशनचे इद्रीस डोसानी तथा पत्रकार यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात मा.राजेश वजीरे यांनी कोरोना संबंधी माहिती दिली. तसेच उपाययोजना सुचविल्यात. डॉ. श्याम जाधव नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकातून नाँन कोवीड रुग्णांकरिता आरोग्यधाम हाँस्पीटलमधील सेवा यापुढेही अशीच पूर्ववत सुरू राहील असे आश्वस्त केले. याप्रसंगी आरोग्यधाम हाँस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत रोकडे, प्रशासकीय संचालक डॉ.संदीप दुधे, डॉ. श्रीकृष्ण पाटील, डॉ. आशीष शेजपाल उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन कदम यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.संदीप दुधे यांनी केले.
नियमित सेवा सुरूच राहतील
नागरिकांच्या विश्वासाने आरोग्यधाम यशस्वी वाटचाल करीत आहे. दिग्रस परिसरात कोव्हीड रुग्णांसाठी प्रभावी व्यवस्था नव्हती. परिसरातील नागरिकांना बरीच धावपळ करावी लागत होती. हे कोवीड हॉस्पिटल म्हणजे रुग्णसेवेतील एक महत्त्वाचं पाऊल आहे. कोरोनाबाधितांना इथेच स्थानिक पातळीवर आरोग्यसुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
आरोग्यधामच्या नियमित सुविधा आहे त्याप्रमाणेच सुरू राहतील. पूर्वी होत्या तशाच पद्धतीच्या सेवा सुरूच राहतील. कोरोना म्हणजे जणू राष्ट्रीय संकटच आहे. एक राष्ट्रकार्य म्हणूनच आम्ही कोरोनाबाधितांसाठी ही सेवा सुरू केली आहे. नागरिकांनादेखील सोशल डिस्टंसिंग, वारंवार हात धुणे, गर्दी टाळणे या दक्षता सर्वांनी घ्याव्यात.
डॉ. श्याम जाधव नाईक