मेंढोली येथे शेतक-याची विष पिऊन आत्महत्या

शेतक-यावर 50 हजारांचं पीक कर्ज

0

शिंदोला: वणी तालुक्यातील मेंढोली येथील शेतकरी अरविंद मारोती घुगुल (49) या तरुण शेतकऱ्यानी स्वतःच्या शेतात कीटकनाशक पिऊन जीवन संपविल्याची घटना शनिवारला सकाळी 8 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मयत घुगुल यांचेकडे आई व त्यांच्या नावे 6 हेक्टर 55 आर सामाईक शेतजमीन आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्याचे नावे मेंढोली ग्राम विविध सहकारी संस्थेचे 48,900 रुपयांचे चालू हंगामातील पीक कर्ज आहे. त्यामुळे त्याने कर्जातून आत्महत्येचं पाऊल तर उचललं नाही ना असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शिरपूर पोलीसानी  घटनेचा पंचनामा केला. प्रेताची उत्तरीय तपासणी करून अंतीमसंस्कार करण्यात आले. त्याचे मागे आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.