पूरग्रस्त गावातील गरजूंना धान्याच्या कीट व ब्लँकेटचे वाटप

रंगनाथस्वामी अर्बन निधी व श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेचा मदतीचा हात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सुपरिचित पतसंस्था रंगनाथस्वामी अर्बन निधी व श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेद्वारा पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. पतसंस्थेचे अध्यक्ष संजय खाडे, संगिता खाडे, ईश्वर खाडे यांच्यासह गावातील हस्ते कोना, रांगणा, भुरकी, झोला या पूरग्रस्त गावात जाऊन धान्याच्या कीट व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

जुलै महिन्यात वणी तालुक्यातील अनेक गावांना पुराचा जबर फटका बसला. या संकटातून गावकरी सावरले नसताना ऑगस्ट महिन्यात नदीकाठच्या गावांना पुराचा आणखी फटका बसला. त्यामुळे संजय खाडे यांनी खा. बाळू धानोरकर यांच्या मार्गदर्शनात पतसंस्थेच्या वतीने कोना, रांगणा, भुरकी, झोला या गावात जाऊन 150 धान्याच्या कीट व 150 ब्लँकेटचे वाटप केले. तर इतर पूरग्रस्त गावांना लवकरच मदत पोहोचती केली जाणार आहे.

या वेळी कोना गावाचे सरपंच रंजना खामनकर, उपसरपंच विजय परचाके, झोल्याचे सरपंच वैशाली सूर, उपसरपंच अशोक सूर, भुरकीचे सरपंच हरिश्चंद्र बदकी, रांगणा गावाचे सरपंच प्रकाश बोबडे, उपसरपंच दिलीप परचाके यांच्यासह पतसंस्थेचे संचालक ईश्वर खाडे यांच्यासह संस्थेचे कर्मचारी अनुराग आईतवार, अनुज भट, अतुल घाटोळे, वृषभ बोबडे, हितेश कोहाड यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

हे देखील वाचा: 

वणीत रंगणार T-10 चा थरार… 8 सप्टेंबर रोजी खेळाडुंचा लिलाव

विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम

Comments are closed.