अडेगाव येथील ‘त्या’ तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

वणी मुकुटबन मार्गावर 29 ऑगस्ट रोजी झाला होता अपघात

जितेंद्र कोठारी, वणी : अपघातात गंभीर जखमी झालेल्या अडेगाव येथील तरुणाची 4 दिवस मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. उपचारा दरम्यान नागपूर येथील रुग्णालयात गुरूवारी रात्री त्या तरुणाची प्राणज्योत मालवली. संदीप विठ्ठल पानघाटे (27) रा. अडेगाव, ता. झरीजामणी असे मृत तरुणाचे नाव आहे. दुर्देवाची बाब म्हणजे मृतक संदीपला आई वडील नसून त्याचे अंत्यसंस्कार आज त्याच्या बहिणीचे गाव वणी तालुक्यात निवळी येथे करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, अडेगाव येथील संदीप विठ्ठल पानघाटे हा युवक 29 ऑगस्ट रोजी दुचाकीने वणी येथे आला होता. काम आटोपून परत अडेगाव जाण्यासाठी निघालेल्या संदीपच्या दुचाकीचा वणी मुकुटबन मार्गावर 18 नंबर रेल्वे ब्रिजजवळ अपघात झाला. या अपघातात संदीपच्या डोक्याला जबर मार लागून तो ब्रेनडेड अवस्थेत गेला.

दुर्घटनेनंतर वणी ग्रामीण रुग्णालयातुन त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र मेंदूला मार असल्यामुळे त्याला नागपूर येथे पाठविण्यात आले. संदीपला आई वडील नाही तसेच घरची परिस्थिती हलाकीची असल्याने अडेगाव येथील काही युवकानी संदीपच्या उपचारासाठी वर्गणी जमा करून काही रक्कम पाठविली. नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री संदीपचा मृत्यू झाला. पोस्टमार्टमनंतर संदीपच्या मृतदेहावर वणी तालुक्यातील निवळी येथे त्याच्या बहिणीच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे देखील वाचा – 

बहिणीला भेटायला आला आणि गळफास घेऊन जीवन संपविला

Comments are closed.