स्पर्श क्लिनिक येथे त्वचारोगांविषयी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध

त्वचांचे विविध विकार व स्त्रीयांच्या विविध रोगांवर उपचार.... लहान मुलांसाठी सुवर्णप्राशन संस्कार चिकित्साही उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: जत्रा रोडवरील संत गाडगेबाबा चौक येथील स्पर्श क्लिनिक येथे त्वचेसंबंधी अत्याधुनिक उपचार सुविधा सुरू करण्यात आली आहे. यात विविध त्वचा रोग व विकार, डर्मा रोलर (पिंपल्स), क्वाटेराईझेशन, डर्मा सक्शन (ब्लॅकहेड, व्हाईटहेड) बी.बी. ग्लो ट्रिटमेन्ट इत्यादींवरचे खात्रीशीर उपचार करण्यात येते. याशिवाय त्वचारोग, स्त्रीयांचे विकार, पचनासंबंधी सर्व तक्रारी, लहान मुलांचे विकार इत्यादीसह लहान मुलांसाठी सुवर्ण प्राशन संस्कार ही सुविधा देखील आहे. विविध उपचारासाठी सकाळी 9 ते रा.  8 यावेळेत रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहन स्पर्श क्लिनिकच्या संचालिका व जनरल फिजिशियन, डरमॅटोलॉजिस्ट डॉ. पूजा ठाकरे-काळे (BAMS, MD, CGO, CSD, DYNS) यांनी केले आहे. अधिक माहिती व नंबर लावण्यासाठी संपर्क: 9325245431

त्वचा समस्या ही सामान्य बाब आहे आणि त्यांच्याबद्दलचे गैरसमजही सर्वसाधारण असतात. योग्य माहिती नसल्याने निरर्थक व हानिकारक औषधोपचार करण्याचेही प्रमाण खूप आहे. त्वचारोगांबद्दल अज्ञान व भीती खूप असल्याने फसवेगिरीही फार आढळते. रुग्ण आपल्या समस्येवर अनेक ऐकिव माहितीवर उपचार करतात. यामुळे दिशाभूल होऊन त्वचेचे नुकसान होते शिवाय त्याच्या दुष्परिणामांनाही सामोरं जावं लागते. वणीतील गाडगेबाबा चौक येथील स्पर्श क्लिनिक येथे त्वचेच्या विविध विकारांवर योग्य तो उपचार केला जातो.

सर्वसामान्य त्वचाविकार कोणते असते?
केसांचे गळणे, केस पांढरे होणे, सोरियासिस, काळे डाग, गजकरण, शेरण्या, चेह-यावरील वैवण्य, वांग, मुरूम, मुरूम झाल्यानंतर मुरुमांचे आलेले डाग, चामखिळ, मस, तिळ, नागिन-नायटा, हातापायाला भेगा पडणे, अंगावर पित्त येणे इत्यादी त्वचाविकारावर स्पर्श क्लिनिकमध्ये उपचार होते. तसेच स्त्रीयांचे विविध विकार जसे पाळीच्या तक्रारी, अती रक्तस्राव, अंगावरून पांढरे जाणे, पाळी न येणे, पीसीओडी, रक्ताची कमतरता इत्यादींवरही उपचार होतो.

मुलांसाठी सुवर्णप्राशन संस्कार
मुलांचा शारीरिक, मानसिक व बौद्धीक विकास होण्यासाठी आयुर्वेदात सुवर्णप्राशन ही संस्कार ही चिकित्सा पद्धती दिली आहे. सुवर्णप्राशन म्हणजे सोन्याचे भस्म किंवा अंश काही आयुर्वेदिक औषधांमध्ये मिसळून त्यांचे एकत्र मिश्रण बनवले जाते. नवजात बालकांपासून ते 12 वयोवर्षाच्या मुलांपर्यंत सर्वांना या औषधांचे काही थेंब दिले जातात. त्यामुळे मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढणे, पाचनशक्ती सुधारणे इत्यादी फायदा होतो. प्रत्येक महिन्याच्या पुष्प नक्षत्राला मुलांना 2 थेंब देऊन ही चिकित्सा केली जाते.

इतर सुविधाही उपलब्ध
स्पर्श क्लिनिकमध्ये नेबुलायझर (वाफारा), ग्लुकोमीटर (रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी यंत्र), बीपी तपासणी, मशिनद्वारा मस, तिळ काढण्याची सुविधा, पंचकर्म, अग्नीकर्म, रक्तमोक्षण इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय लहान मुलांचे विविध विकार व पचनासंबंधीच्या सर्व तक्रारी जसे ऍसिडीटी, बद्धकोष्ठ, अपचन, गॅसेस, मुतखडा, स्थूलपणा, शौचास रक्त येणे, मुळव्याध इत्यादींवरही उपचार उपलब्ध आहे.

डॉ. पूजा ठाकरे-काळे (BAMS, MD, CGO, CSD, DYNS) जनरल फिजिशियन, डरमॅटोलॉजिस्ट
पत्ता: स्पर्श क्लिनिक, जत्रा रोड, संत गाडगेबाबा चौक वणी
दवाखान्याची वेळ: सकाळी 9 ते रा. 8 वाजेपर्यंत (शनिवारी बंद)
अधिक माहिती व नंबर लावण्यासाठी संपर्क: 9325245431

 

Comments are closed.