जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सन्मान सोहळा थाटात संपन्न

कर्मचारी व सदस्यांचा करण्यात आला सत्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा शनिवारी सन्मान सोहळा पार पडला. शेतकरी मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सण 2020-2021 या वर्षात कर्जाची योग्य प्रमाणात वसुली करून बँकेला सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वामनराव कासावार, प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष देविदास काळे, बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, उपाध्यक्ष संजय देरकर, विभागीय अध्यक्ष राजीवरेड्डी येलटीवार, नरेंद्र पाटील ठाकरे ,सुरेश काकडे, प्रमोद वासेकर, प्रशांत गोहोकार, मोरेश्वर पावडे, पुरुषोत्तम आवारी, संदीप बुरेवार, प्रशासकीय अधिकारी गोंडे, उपस्थित होते.

या सन्मान सोहळ्यात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने वणी विभागात 75 टक्केच्या वर कर्ज वसुली करणाऱ्या 74 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव पदाधिकारी व सदस्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या सन्मान सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोगरे म्हणाले की आपली माणसे, आपल्या सेवेत… शेतकऱ्यांचे हीत हेच आमचे ब्रीद… हे ब्रिदवाक्याला धरून सरकारच्या विविध योजना शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार व या योजनेचा विनाविलंब लाभ देण्याचा प्रयत्न राहील. उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी बँकेमार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना विषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय देरकर यांनी केले. यावेळी ते म्हणाले की शेतकरी बांधवाना जो विमा देण्यात येतो त्या संदर्भात विमा कंपनीकडून मार्गदर्शन करण्यात येईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप अलोणे आभार जनसंपर्क अधिकारी बंडू रासेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण दुधे, विभागीय अधिकारी किशोर बुच्चे , व्यवस्थापक चामाटे तसेच सर्व बँकेचे व्यवस्थापक कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

अखेर राजूर येथील बेपत्ता मुलाचा सापडला मृतदेह

स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही हटवांजरी (पोड) येथे रस्ता नाही

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.