दिवाळी, दसरा, ईद आदी सणांसाठी मार्गदर्शक सूचना

एस. डी.पी.ओ. पुज्जलवार नेतृत्वात शांतता कमिटीची बैठक

0

नागेश रायपुरे,मारेगाव: आगामी काळात होणारे दिवाळी, दसरा, ईद वगैरे सण, उत्सव तालुक्यातील जनतेने शांततेत साजरे करावेत. पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांनी केले. ते मारेगाव पोलीस स्टेशनला झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होते.

Podar School 2025

तसेच पोलीस स्टेशनमध्ये आपल्या समस्येचे निराकरण न झाल्यास थेट त्यांच्याशी संपर्क करा. पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी आहे. असेही ते यावेळी म्हणालेत. आगामी काळात दसरा, दुर्गा देवी, शारदा देवी विसर्जन, महापरिनिर्वाणदिन, दिवाळी, ईद, होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन मारेगाव येथे शांतता कमिटीची बैठक झाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांनी आगामी काळात होणाऱ्या सण उत्सवानिमित्त सूचना दिल्यात. यावेळी पो.नि. जगदीश मंडलवार यांनी तालुक्यातील आढावा प्रास्ताविक केले. यावेळी शहरातील शांतता कमिटीचे सदस्य, राजकीय पुढारी, समाजसेवक, पत्रकार आदी उपस्थित होते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.