डॉ. दिलीप अलोने यांना नटस्रेष्ठ निळू फुले कला वैभव पुरस्कार जाहीर
लवकरच अकोला येथे होणार मान्यवरांच्या हस्ते सन्मान
पुरुषोत्तम नवघरे, वणी: नट श्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशन अकोला यांच्या वतीने येथील लोककलावंत डॉक्टर दिलीप अलोने यांना नट श्रेष्ठ निळू फुले कला वैभव पुरस्कार जाहीर झाला असून अकोला येथे आयोजित रंगभूमी महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार समितीचे सदस्य पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर गिरीश गांधी, मकबूल तांबोळी, डॉक्टर बाबा आढाव, गोपाल खंडेलवाल यांच्यावतीने फाउंडेशनचे रमेश थोरात सुधाकर गीते यांनी ही माहिती दिली.
बालवयात 1972 मध्ये चंद्रपूर येथे नट श्रेष्ठ निळू फुले यांची भेट घेऊन त्यांच्याच प्रेरणेने व आशीर्वादाने आपण कलेच्या क्षेत्रात पदार्पण केले आणि वयाच्या 68 व्या वर्षी आपण हे सातत्य टिकवून आहोत. आज त्यांच्याच नावाने हा सन्मान होतो आहे याच्या आनंद आहे, असे मत डॉक्टर अलोने यांनी व्यक्त केले
डॉक्टर अलोने यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने लोककला पुरस्कार तसेच अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईच्या वतीने सर्वोत्कृष्ट एकपात्री कलावंत पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे त्यांच्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून आनंद व्यक्त होत आहे



Comments are closed.