‘प्रतीक्षा’ या कथासंग्रहाचे अभिनेत्री सुकन्या कुळकर्णीच्या हस्ते प्रकाशन

विदर्भातील हरहुन्नरी कलावंत प्रा. डॉ. दिलीप अलोणे यांची नवी कलाकृती

0

सुनील इंदुवामन ठाकरे, ठाणेः विदर्भातील हरहुन्नरी कलावंत प्रा. डॉ. दिलीप अलोणे यांचे साहित्य, नाट्य, नकला, हस्तकला, जादुगरी, शेती अशा विविध क्षेत्रांत कार्य आहे. त्यांनी विविध साहित्यप्रकार हाताळले आहेत. त्यातीलच बहुप्रतीक्षित कथासंग्रह ‘‘प्रतीक्षा’’चे ठाणे येथील कॉसमॉस हवेली येथे अभिनेत्री सुकन्या कुळकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी अभिनेते संदीप गायकवाड, कमलेश ठक्कर, प्रफुल्ल सामंत, दिग्दर्शक विक्की मोकल, आकाश मोकल उपस्थित होते. हास्यसम्राट भारत गणेशपुरे, दीपक देशपांडे, अतीशा नाईक, सागर कारंडे यांना यावेळी हा कथासंग्रह भेट देण्यात आला.

‘तो’ सध्या काय करतो ?

डॉ. दिलीप अलोणे यांची सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा……https://wanibahuguni.com/interview/interview-of-dilip-alone/

विजय प्रकाशन नागपूर द्वारा प्रकाशित या कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी बोलताना अभिनेत्री सुकन्या कुळकर्णी यांनी डॉ. अलोणे यांच्या कथासंग्रहावर सुरेख विेवेचन केले. त्या म्हणाल्या की, भारतीय स्त्रियांचे विश्व यात अगदी समृद्ध केले आहे. त्यांच्या भावभावनांचा, संस्कृतीचा, संस्कारांचा परिपूर्ण अविष्कार या कथासंग्रहात पाहायला मिळतो. स्त्रीचं मनोविश्व किती व्यापक असतं, याचा आवाका नेमक्या शब्दांमध्ये मांडण्याचं कसबं लेखकाला गवसलं असल्याचंही त्या म्हणाल्या. यामुळे फुलांना हारात गंुफावे तसे अनेकविध विषयांना आपल्या कथांना गुंफण्यात लेखक डॉ. दिलीप अलोणे यशस्वी झालेत. वाचन या कथासंग्रहाचे स्वागत करतीलच असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकाशन समारंभाला सिने, नाट्य, साहित्य, कला तसेच विविध क्षेत्रांतील साहित्यरसिक प्रामुख्याने उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.