डॉक्टर तुम्हीसुद्धा…! एका डॉक्टरची दुस-या डॉक्टरला मारहाण

उधारीवरून वणीतील दोन प्रतिष्ठीत डॉक्टर मित्रांमध्ये वाद

जितेंद्र कोठारी , वणी: पेशाने दोन्ही डॉक्टर असून दोघही चांगले मित्रही होते. मात्र पैश्याच्या देवाण घेवाणवरून दोघात वाद होऊन प्रकरण मारहाण व नंतर पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. डॉक्टरी पेशाला लज्जित करणारी ही घटना गुरुवार दुपारी शहरातील एक खासगी हॉस्पिटलमध्ये घडली.

Podar School 2025

प्राप्त माहितीनुसार वणी शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत निवासी चिकित्सक डॉ. सुदर्शन कळकटे (पाटील) हे रवीनगर भागात राहतात. रविमध्येच राहणारे व खातीचौक भागात दवाखाना असलेले दंत चिकित्सक डॉ. विजय राठोड व डॉ. पाटील हे दोघे चांगले मित्र होते. मैत्रीच्या नात्यात दोघांमध्ये पैश्याची देवाण घेवाण व्हायची. मात्र उसनवारीने दिलेले पैश्यावरूनच दोघांच्या मैत्रीत दरी निर्माण झाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

डॉ. पाटील यांनी गुरुवार 23 डिसेंम्बर रोजी वणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार डॉ. राठोड यांनी मागील दीड वर्षात वेगवेगळे कारण सांगून त्यांच्याकडून अनेकदा उसनवारीने पैसे घेतले. कधी रोख तर कधी बँकेमार्फत पैसे ट्रान्सफर करण्यात आले. मैत्रीच्या भावनेने डॉ. पाटील यांनी डॉ. राठोडकडे पैसे परत करण्यासाठी काही जास्त तगादा केला नाही.

मात्र त्यांना पैसेची अडचण भासू लागली तेव्हा त्यांनी डॉ. राठोड यांच्याकडे त्यांच्याकडे बाकी 2 लाख 98 हजार रुपयांची मागणी केली. परंतु डॉ. राठोड यांनी सतत टाळाटाळ केली. अखेर डॉ. पाटील यांनी ही बाब त्यांचे वडील दिगंबर कळकटे यांनी सांगितली. त्यामुळे दिगंबर कळकटे यांनी डॉ. राठोड याना फोन करून मुलाने दिलेले पैसे परत करा असा तगादा लावला.

गुरुवार 23 डिसेंम्बर रोजी डॉ. पाटील हे खाजगी हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर होते. तेव्हा डॉ. राठोड यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉ. पाटील यांना शिवीगाळ करून थापड मारली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. अशी तक्रार डॉ. सुदर्शन कळकटे यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये दिली. तक्रारीवरून डॉ. विजय राठोड विरुद्ध कलम 323, 504, 506 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विदर्भस्तरिय कराटे स्पर्धेत वणीतील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

 

Comments are closed.