विदर्भस्तरिय कराटे स्पर्धेत वणीतील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

निस्किन मंक्स कुंग-फु क्लासच्या विद्यार्थ्यांची 23 पदकांची लयलूट

रमेश तांबे, वणी: विदर्भ स्तरीय कराटे स्पर्धेत वणीच्या निस्किन मंक्स कुंग-फुच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. मुल, जिल्हा चंद्रपूर येथे 18 व 19 डिसेंबर रोजी पार पडलेल्या स्पर्धेत वणीच्या 23 कराटेपटुंनी सहभाग घेतला होता. यात 4 विद्यार्थ्यांना सुवर्ण व 8 विद्यार्थ्यांना रौप्य तर 11 विद्यार्थ्यांनी कास्य पदक पटकाविले.

शिवम डाफे, तन्वी काकडे, क्रिष्णा त्रिवेदी, तपस्वी नागपूरे यांना सुवर्ण पदक मिळाले. लेखा कुमरे, निधी त्रिवेदी, गुंजन बढे, आर्यन पवार, शौर्य पाटील, अंश निब्रड, नेहा ग्रहांचे, सर्वदा मुरस्कर यांना रौप्य पदक मिळाले. अनिरूध्द डाफे, रोहिणी नघाटे, प्रणिती नागपूरे, शौर्य गौरकार, क्रिपा त्रिवेदी, प्रांजली ठक, आबीर देठे, इशिका देठे, आर्या टिमांडे, समीक्षा नैताम, क्रितीका जाधव यांना कास्यपदक मीळाले. या विदर्म स्तरीय स्पर्धेत गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे 600 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

स्पर्धकांना मुख्य प्रशिक्षक शरद चिकाटे यांच्या मार्गदर्शनात मास्टर सेंन्साई नरेश मुरस्कर, सिध्दार्थ सोनारखन, सुबोध वाढ ई, सचिन डाफे , यशवंत टेकाम व महिला प्रशिक्षक शारदा ठक यांनी प्रशिक्षण दिले होते. सर्व विद्यार्थ्यांनी पुरस्कार प्राप्त केल्यामुळे शहरात कौतुक होत आहे.

हे देखील वाचा:

‘ती’ आत्महत्या नसून हत्याच… आरोपीविरोधात गुन्हा दाखल

मंगेश बलकी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Comments are closed.