शेतकऱ्याना तातडीने बोंड अळीची नुकसान भरपाई द्या – डाॅ. महेन्द्र लोढा

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षातील बोंड अळीची नुकसान भरपाई अजून पर्यंत न मिळाल्याने शेतकरी आर्थिक डबघाईस आला. मात्र शासनाच्या चालढकल धोरणाने तालुक्यातील अनेक शेतकरीआजही बोंड अळीच्या नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रतीक्षेत आहे. त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी. यासाठी २६ आॅक्टोबरला मारेगाव तहसील कार्यालयात राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत प्रदेश सरचिटणीस डाॅ.महेन्द्र लोढा यांनी तहसीलदार विजय साळवे यांना निवेदन सादर केले.

Podar School 2025

शेतकऱ्यांच्या असलेल्या विविध समस्येला हात घालत डाॅ.महेन्द्र लोढा यांच्या नेतृत्वात मारेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भारत मत्तेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसान भरपाई, शेतकऱ्याच्या हितासाठी दिवसा भारनियमन टाळावे, धडक सिंचन विहिर योजनेतील लाभार्थ्याना तातडीने विज जोडणी करावी, सरकारी कापूस सोयाबीन खरेदी सुरु करावी या व इतर मागण्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस डाॅ.महेन्द लोढा यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमवेत निवेदन सादर केले. या सर्व शेतकर्यांच्या समस्या दिवाळीच्यापूर्वी सोडवा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असा इशारा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.