पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीची सुपुत्री डॉ. रसिका दिलीप अलोणे यांनी आंतरराष्ट्रीय योगा ट्रेनर म्हणून मान्यता मिळवली आहे. बोधी स्कूल ऑफ योगा, हैदराबाद या संस्थेच्या वतीने आयोजित कार्यशाळेत प्रविण्य मिळवत त्यांनी हा बहुमान मिळवला आहे. वैद्यकीय क्षेत्रात योगा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे याचा उपचारात समन्वय साधून रुग्णसेवा करण्यासाठी योगाचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतल्याचे मनोगत डॉ. रसिका यांनी व्यक्त केले. सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्राची आवड असलेल्या डॉ. रसिकानी आता योगा क्षेत्रातही मिळवलेल्या प्राविण्यामुळे त्यांचे सर्वत कौतुक व अभिनंदन होत आहे. डॉ. रसिका ही हरहुन्नरी कलावंत डॉ. दिलीप अलोणे यांची मुलगी आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post
Comments are closed.